no images were found
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पडला. दीप प्रज्वलन व शहिदांना श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर, महानगरपालिकेच्या उप. आयुक्त साधना पाटील, शाहुवाडीचे तहसिलदार रामलिंग चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त), तसेच ध्वजदिन निधी संकलन 2022 साठी योगदान दिलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व देणगी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते.
ले. कर्नल श्री. माने यांनी प्रास्ताविक केले आणि ध्वजदिन निधी संकलनाचे महत्व सांगितले. युध्दजन्य परिस्थितीत शहीद झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबदल प्रशस्तीपत्रक, धनादेश, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलन 2022 करीता स्वच्छेने देणगी, उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, कार्यालये यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.