“अप्सरा” येणार १० मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी “अप्सरा” या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. …