
no images were found
चिनी प्रकाश यांच्या स्पेशल डान्स सिक्वेन्समुळे प्रभावी चित्रण…
सोनी सबवरील श्रीमद् रामायण आता पुढील टप्प्यात पदार्पण करत आहे.१४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) हे 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतत आहेत. या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी दिवाळीसारखे वातावरण आहे. अयोध्येतील नागरिक आपल्या दैवी जोडप्याच्या स्वागतासाठी दिवे प्रकाशित करत आहेत. हा महाउत्सवाचा प्रसंग चित्रीत करण्यासाठी दिवाळीसारखा अद्भुत सिक्वेन्स चित्रीत करण्यात आला आहे. यात तब्बल 10 हजार दिवे लावण्यात आले असून अंधारावर प्रकाशाची मात होते, याचे प्रतीक दाखवण्यात आले आहे. दिवाळीसारखे वातावरण तयार झाल्याने एक दिव्यत्वाचा अनुभव येतो. प्रेक्षकांसाठी हा प्रसंग निश्चितच संस्मरणीय राहील.
या भव्य सादरीकरणात, स्पेशल कोरिओग्राफी असलेला डान्स सिक्वेन्सदेखील आहे. प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफक चिनी प्रकाश यांनी यावर मेहनत घेतली आहे. या नृत्य सादरीकरणातून केवळ दीपोत्सवातील उत्साह दाखवण्यात आला आहे, असे नाही तर श्रीराम आणि सीतेच्या पुनरागमावेळच्या सुंदर भावनाही अधोरेखित झाल्या आहेत. पारंपरिक नृत्य प्रकार आणि सिनेमॅटिक लहेजा या वैशिष्ट्यांचा मिलाप प्रकाश यांच्या कोरिओग्राफीत दिसून येतो. यात आर्तता आणि भावनिकतेची सुंदर जोड असते. पडद्यावर हा प्रसंग अत्यंत खराखुरा भासण्यासाठी दोन दिवसांची सलग मेहनत आणि खूप रिहर्सल्स घ्याव्या लागल्या.
श्री रामाची भूमिका करणारे सुजय रेऊ म्हणाले, ‘महायुद्धावरून श्रीरामाचे अयोध्येला परतणे हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि भावपूर्ण आहे. अयोध्येतील रहिवाशांचे दैवत असलेले हे जोडपे पुन्हा परत येत असल्याने नागरिकांसाठी परमोच्च आनंदाचा प्रसंग आहे. हा आनंद दर्शवण्यासाठी ते उत्सुक आहेत. आम्ही हा सिक्वेन्स बाहेरच चित्रीत केला. एवढा सुंदर सेट पाहून मी भारावून गेलो होतो. तिथे 10,000 दिवे होते आणि डान्स करणारे एका लयीत ते दिवे घेऊन नृत्य सादर करत होते. श्रीमद् रामायणातील हा महत्त्वाचा सिक्वेन्स आहे. त्या काळात अयोध्येत पहिली दिवाळी साजरी करत असताना किती अद्भुत वातावरण असेल, याची मी फक्त कल्पनाच करू शकतो…
कोरिओग्राफर चिनी प्रकाश म्हणाले, ‘ सोनी सबवरील श्रीमद रामायणात डान्स सिक्वेन्स करण्याचे भाग्य मला लाभले. आम्ही अनेक दिवस रिहर्सल केली. हे सगळं एकत्रित दृश्य पाहताना खूप छान वाटत होतं. या दृश्याची भव्यता श्वास रोखणारी होती. सेटवर 10 हजार दिवे उजळले होते आणि सर्व डान्सर्सच्या हाती हे दिवे …खूप सुंदर दृश्य होते. हे सिक्वेन्स चित्रीत करण्यासाठी खूप वेळ घेतला, पण रिझल्ट खूप छान मिळाला. माझ्यासाठी हा अनुभव खरोखरच खूप विशेष आहे. या संधीसाठी मी खरोखरच खूप आभारी आहे. ’