
no images were found
‘वागले की दुनिया’ मालिकेत राजेश वागळेवर ऑफिसमधील पैसे गायब झाल्याचा संशय…
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया- नई पिढी नए किस्से’ मालिकेत भारतीय मध्यमवर्गातील कुटुंबाला दैनंदिन जीवनात येणारी संकटे आणि त्यांच्यावर केलेली मात याचे चित्रण सुंदर पद्धतीने दाखवले जाते. नुकत्याच झालेल्या भागात अर्थर्वला शाळेत इंडस्ट्रीविषयीचा अनुभव असलेला प्रोजेक्ट दिला जातो. अनन्यावर इम्प्रेशन टाकण्यासाठी अथर्व बढाया मारतो. त्याचे वडील एका कंपनीचे मालक आहेत आणि तिथे आपल्या टीमला सहज इंटर्नशिप करता येईल असे सांगतो..
आगामी भागात, अथर्व हे खोटं तसेच सुरु ठेवतो आणि वडिलांच्या ऑफिसमध्ये मित्रांची इंटर्नशिप सुरु करतो. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये त्याचा एक मित्र काम करत असताना नाट्यमय प्रसंग येतो. कंपनीच्या खात्यात मोठी तूट आढळून येते. याचा संशय थेट राजेशवर येतो. आपण किती श्रीमंत आहोत, हे अथर्वला दाखवण्यासाठी राजेश प्रयत्न करत असतो, असे दाखले दिले जातात. हा मुद्दा अधिक गंभीर होतो. राजेश स्वत:च कोड्यात पडतो. त्यामुळे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातही त्याला टेंशन येते.
यातून राजेश कसा बाहेर पडेल? तसेच अथर्व त्याच्या वडिलांचे ऑफिसमध्ये नेमके पद काय आहे, हे सांगू शकेल का?
वागले की दुनिया मालिकेत राजेश वागळेची भूमिका करणारा सुमित राघवन म्हणाला, ‘अथर्वसमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी राजेशने खूप वेगवेगळे प्रयत्न केले. मात्र या भूतकाळातील चुकांमुळे ऑफिसमधील पैसे वापरल्याचा चुकीचा आरोप होतो तेव्हा राजेश स्वत:च तो निर्दोष आहे, हे सिद्ध करु शकत नाहीये. दरम्यान, अथर्वसमोर त्याचे वेगळे आव्हान आहे. त्याचे वडील कंपनीचे मालक आहेत, या असत्यामध्ये तो अडकला आहे. पुढील भागात अथर्व आणि राजेश हे दोघेही एवढी कठीण परिस्थिती कशी हाताळतील, हे दिसून येईल. ’