
no images were found
ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी दुहेरी पदवी महत्त्वाची : डॉ. पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी दुहेरी पदवी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. के. बी.पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापिठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व सांगली येथील श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठातील संलग्नित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी दुहेरी पदवी विशेष व ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन व श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ.बी.पी.मरजे होते. यावेळी विद्यापीठाच्या संलग्नित विविध शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य,संचालक प्रा.डॉ.डी. के.मोरे,उपकुलसचिव डॉ.व्ही.बी.शिंदे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले,कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्याला दुहेरी पदवीसाठी पात्र होता येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा. एकाच वेळी दोन पदवी, पदव्युत्तर व डिप्लोमा करता येणार आहे.एक नियमित व एक दूर शिक्षण पद्धतीने पदवी पूर्ण करता येते.बी.एड अभ्यासक्रमासाठी प्रवेशीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी आहे.त्यामुळे या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. यावेळी सहा. प्रा. डॉ. मुफिद मुजावर यांनी दुहेरी पदवी अर्जाबाबत सादरीकरण केले.
प्राचार्य डॉ.बी.पी.मरजे म्हणाले,दुहेरी पदवी बाबत व्यापक प्रचार व प्रसार व्हावा. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुरू केलेल्या दुहेरी पदवीची अंमलबजावणी व्यापक प्रमाणे सर्व विद्यापीठाने राबविली पाहिजे. दुहेरी पदवीचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना होऊ शकतो. शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा. यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. नितीन रणदिवे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. प्रकाश बेळीकट्टी यांनी केले. तर डॉ. चांगदेव बंडगर यांनी आभार मांडले.