
no images were found
छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाखांची “भगवी” दहीहंडीचा थरार
कोल्हापूर : मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या “भगवी दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले होते. गेली १७ वर्षे अखंडितपणे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ यांच्यावतीने “भगवी” दहीहंडीचे आयोजन करण्यात येते आहे.
यंदा ही शिवसेनेची “भगवी” दहीहंडी भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. याचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी गोविंदा पथकांकडून यशस्वीरित्या सलामी देण्यात आल्या. ” ” यांनी पाचवा थर लावत शिवसेनेची भगवी दहीहंडी फोडली. यावेळी गोंविदा पथकाकडून जल्लोष करण्यात आला. विजेत्या ” ” गोविंदा पथकाला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडून रोख रु.१ लाख व मानपत्र बक्षीस देण्यात आले. यासह दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदालाही बक्षीस देण्यात आले. त्याचबरोबर सलामीसाठी, थरांसाठी रोख रक्कमांची बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी खास स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसेही उपस्थित महिलांना दिली गेली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, कपिल केसरकर, अवधूत अपराध, अमित जाधव, यश काळे, आशिष पुतलीया, राहुल अपराध, रुपेश डोईफोडे, आदी मोठ्या शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.