वागले की दुनिया मालिकेत राजेश सखी–विवानच्या नात्याची कसोटी घेणार सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’ ही मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाकडे बघते. अलीकडच्या भागांमध्ये, वागले कुटुंब भावनिक संकटांचा सामना करताना दिसत आहे. साईदर्शन सोसायटीच्या पुनर्विकासापासून ते राधिका (भारती आचरेकर)ची स्मृती अचानक जाण्यापर्यंत! या सगळ्या गदारोळात राजेश (सुमित राघवन) सखी (चिन्मयी साळवी)ला विवान (नमित शाह)पासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण उलट ते …