no images were found
वागले की दुनिया मालिकेत राजेश सखी–विवानच्या नात्याची कसोटी घेणार
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’ ही मालिका एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाकडे बघते. अलीकडच्या भागांमध्ये, वागले कुटुंब भावनिक संकटांचा सामना करताना दिसत आहे. साईदर्शन सोसायटीच्या पुनर्विकासापासून ते राधिका (भारती आचरेकर)ची स्मृती अचानक जाण्यापर्यंत! या सगळ्या गदारोळात राजेश (सुमित राघवन) सखी (चिन्मयी साळवी)ला विवान (नमित शाह)पासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण उलट ते दोघे अधिकाधिक जवळ येत असल्याचे त्याच्या लक्षात येते, त्यामुळे कुटुंबातला तणाव आणखीन वाढला आहे.
आगामी भागांमध्ये, विवानचा एक गंभीर अपघात झाल्यानंतर सखीच्या मनात भावनांचे वादळ उठले आहे. भावनेच्या उर्मीत ती त्याच्यासमक्ष आपले मन मोकळे करते. तिचे बोलणे त्याने ऐकले आहे की नाही हे कळत नाही. त्यांच्या जवळीकीमुळे राजेशची चिंता वाढत चालली आहे. तो हे प्रकरण आपल्या हाती घ्यायचे ठरवतो. वाढदिवसासाठीची योजना करण्याच्या निमित्ताने तो सखीचे लक्ष विवानवरून हटवू पाहतो आणि तिला काही मर्यादाही आखून देतो. पण प्रेम नेहमी आपला मार्ग शोधतेच. गोष्टी थोड्या स्थिरस्थावर होत आहेत असे वाटत असतानाच विवानने सखीप्रती केलेल्या एका रोमॅंटिक कृतीमुळे वागले कुटुंब हादरते. राजेशला हारल्यासारखे वाटते आणि त्या भरात तो त्यांना एक आव्हान देतो आणि सांगतो की, सखी आणि विवानने 21 दिवस एकमेकांशी संपर्क न साधता आपल्या नात्याची दृढता सिद्ध करावी.
सखी आणि विवान प्रेम आणि संयमाची ही कसोटी देण्याचे स्वीकारतील का? की दुरावण्याच्या आणि आपल्याला कोणीही स्वीकारत नसल्याच्या जाणिवेने त्यांच्यात दुरावा वाढेल?
वागले की दुनिया मालिकेत सखीची भूमिका करत असलेली चिन्मयी साळवी म्हणते, “सखीच्या मनात भावना उफाळून आल्या आहेत आणि जीवनाला नवीन दिशा देणारे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण तिचे प्रेम आणि कुटुंब एकमेकांच्या विरोधात आहेत. या प्रसंगी तिच्या मनातील द्वन्द्व आणि तिची ताकद सुंदर पद्धतीने टिपली आहे. आपले नाते आणि मन या दोघांना सांभाळण्यासाठी ती कुठपर्यंत जाऊ शकते, हे या भागात बघायला मिळेल. भावनांचा हा कल्लोळ अनेक तरुण मुलींना परिचित वाटेल.”