no images were found
पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये बापोद्रा चाळीत बदला घेण्यासाठी कादंबरीचे पुनरागमन!
मुंबई, : ‘सोनी सब’वरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ ही मालिका प्रेरणादायी कथानक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध पात्रांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय त आहे. पुष्पा (करुणा पांडे) कायद्याचा अभ्यास करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे, पण तिला नव-नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तिच्या निश्चयाचीच नव्हे तर तिच्या जवळच्या नात्यांचीही कसोटी लागत आहे. नुकत्याच झालेल्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, प्रोफेसर शास्त्री (गौरव चोप्रा) हे कादंबरी (बृंदा त्रिवेदी) विरुद्ध पुरावे गोळा करतात. त्यामुळे ती जेलमध्ये जाते.
आता पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना कादंबरीच्या प्रवासात एक मोठे वळण आलेले दिसेल. जुगल (अंशुल त्रिवेदी) तिला तानाबानाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला सांगतो आणि त्याबदल्यात तिला बापोद्रा चाळीवरील तिचा मालकी हक्क सोडावा लागणार आहे. पण बापोद्रा चाळीत परत येण्याची परवानगी मिळावी, या एकाच अटीवर कागंबरी यासाठी सहमत होते. आपल्या स्वभावाप्रमाणे कादंबरी या चाळीत परत येण्याचा मार्ग शोधते, पण यावेळी तिच्या मनात सूडाची भावना आहे. पण काही वेळातच गोष्टी वैयक्तिक पातळीवर घसरतात. जुगल घर सोडून दिलीप पटेल (जयेश मोरे) सोबत रहायला जातो. तो कादंबरीकडून घटस्फोट देण्याची मागणीही करतो. या सगळ्यात, प्राध्यापक शास्त्रीजी पुष्पाला गुरुदक्षिणा म्हणून पुन्हा कॉलेजमध्ये येण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरु होतो.
पण कादंबरी प्रायश्चित्त घेण्याला पसंती देईल की बदला घेण्यास?
पुष्पा इम्पॉसिबलमध्ये कादंबरीची भूमिका साकारणाऱ्या बृंदा त्रिवेदी म्हणाल्या, “कादंबरी ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे पात्र आहे. कणखर, अनपेक्षित आणि भावनिकदृष्ट्या मजबूत.. गोष्टी अगदी खालच्या थराला गेल्यानंतरही ती खचत नाही. पुन्हा नव्याने विचार करते. चाळीत परत येणे हे बदला घेण्यासाठी नाही तर तिला माहिती असलेल्या एकमेव मार्गाने नियंत्रण मिळवण्यासाठी ती परत आली आहे. एक अभिनेत्री या नात्याने हेराफेरी आणि सूडाने भरलेलं पात्र साकारणे अत्यंत आव्हानात्मक होते. ”