Home सामाजिक स्पार्क्सतर्फे नवी स्प्रिंग समर श्रेणी सादर

स्पार्क्सतर्फे नवी स्प्रिंग समर श्रेणी सादर

4 second read
0
0
35

no images were found

स्पार्क्सतर्फे नवी स्प्रिंग समर श्रेणी सादर

स्पार्क्स या भारतीय तरुणांच्या सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडने स्प्रिंग समर कलेक्शन २०२४ साठी नवी उत्पादन श्रेणी सादर केली आहे. या नव्या श्रेणीमध्ये अप्रतिम स्टाइल डिझाइन आहेच. शिवाय, फॅशन आणि उपयुक्तता यांचा उत्तम मेळ यात साधण्यात आला आहे.
या सादरीकरणाबद्दल रिलॅक्सो फुटवेअर लि.चे कार्यकारी संचालक श्री. गौरव दुआ म्हणाले, “स्टायलिश तरीही आरामदायी अशा पादत्राणांची मागणी पूर्ण करण्यासाठी आमचे नवे स्प्रिंग समर कलेक्शन सादर करताना आम्हाला फार आनंद होत आहे. वजनाला अत्यंत हलक्या, घाम शोषून घेणाऱ्या घटकांपासून बनलेली ही पादत्राणे पायाच्या आकारानुसार काही प्रमाणान लहानमोठी करता येतात. या नव्या श्रेणीतील बहूपयोगी डिझाइन्स कॅज्युअल लुकसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी अगदी योग्य आहेत. अतुलनीय ग्राहकानुभव देण्यास आम्ही बांधिल आहोत आणि या मोसमात एलिगंस आणि सुयोग्य वापर अशी दोन्ही वैशिष्ट्ये असणाऱ्या ग्राहकांमध्ये हे नवे कलेक्शन लोकप्रिय होईल, यावर आमचा विश्वास आहे.”

स्पार्क्सच्या नव्या कलेक्शनमध्ये फॅशन, स्टाइल आणि आरामदायीपणाला एक नवं स्वरूप, नवा आयाम देण्यात आला आहे. यातील अतिशय हलक्या वजनाच्या सँडल्स घाम शोषून घेणाऱ्या कापडापासून बनवण्यात आल्या आहेत. आकाराप्रमाणे कमी-जास्त करता येणाऱ्या सँडल्सची ही नवी श्रेणी सर्व वयोगटातील, सर्वलिंगी व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी एक सुयोग्य पर्याय ठरतील. या कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या अत्यंत आरामदायी आणि ट्रेंडी स्लीपर्सचा समावेश आहे. ‘स्पार्क्स इट्स इन मी’ ही डिजिटल कँपेनसाठीची खास लाइन विविध माध्यमांवर वापरून कंपनीच्या विपणन प्रयत्नांना बळकटी दिली जात आहे.
या नव्या स्प्रिंग समर कलेक्शनसोबत स्पार्क्सने सर्व महत्त्वाच्या रिटेल आऊटलेट आणि इतर ठिकाणी आपली दृश्यमानता वाढवली आहे. ४०५ हून अधिक एक्स्लुसिव्ह ब्रँड आऊटलेट्स (ईबीओ) आणि आघाडीच्या फुटवेअर स्टोअरमध्ये उपलब्ध हे खास तयार करण्यात आलेले कलेक्शन www.relaxofootwear.com येथेही उपलब्ध आहे. समकालीन भारतीय जीवनपद्धतीतील गरज पूर्ण करण्यास हे नवे कलेक्शन आता सज्ज आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…