Home मनोरंजन कलाकारांनी इमोजीच्‍या भाषेचा आनंद साजरा केला!

कलाकारांनी इमोजीच्‍या भाषेचा आनंद साजरा केला!

2 min read
0
0
43

no images were found

कलाकारांनी इमोजीच्‍या भाषेचा आनंद साजरा केला!

आपल्‍यापैकी अनेकांसाठी इमोजी भावना व्‍यक्‍त करण्‍याचे दुसरे माध्‍यम बनले आहे, जसे होकार देण्‍यासाठी थम्‍ब अपचे इमोजी, प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी हार्ट किंवा आनंदमय क्षण शेअर करण्‍यासाठी हसऱ्या चेहऱ्यांचे इमोजी. आजच्‍या धावपळीच्‍या डिजिटल युगामध्‍ये हे लहान आयकॉन्‍स जागतिक स्‍तरावर भावनिक भाषा बनले आहेत, ज्‍यामधून व्‍यक्‍तीच्‍या मनातील भावना व्‍यक्‍त होतात. एण्‍ड टीव्‍हीवरील अभिनेत्री सोनल पनवार (मलायका, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) इमोजींनी त्‍यांच्‍या संवाद साधण्‍याच्‍या व कनेक्‍ट होण्‍याच्‍या पद्धतींना कशाप्रकारे आकार दिला आहे, याबाबत सांगत आहेत. 

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये मलायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनल पनवार म्‍हणाल्‍या, “इमोजी माझ्यासाठी भावना व्‍यक्‍त करण्‍याचे शॉर्टहँड आहेत. माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींना रेड हार्ट पाठवायचा असो किंवा मला एखाद्या गोष्‍टीचा त्रास होतो तेव्‍हा ‘रडणारा-हसणारा’ चेहरा पाठवायचा असो हे लहान इमोजी शब्‍दांशिवाय सर्व भावना व्‍यक्‍त करतात. मला धमाल व अभिव्‍यक्‍त होणारे संवाद करायला आवडतात. माझ्या मते, इमोजी दैनंदिन गप्‍पागोष्‍टींमध्‍ये उत्‍साहाची भर करतात. मी एका इमोजीचा जास्‍त वापर करते, ते म्‍हणजे डोळे बंद केलेल्या माकडाचा इमोजी, ज्‍यामधून माझ्या ‘ऊप्‍स’ किंवा लाजिरवाण्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त होतात. इमोजींनी मजकूराला अधिक वैयक्तिक व आकर्षक केले आहे. वर्ल्‍ड इमोजी डे निमित्त मला समजले आहे की हे लहान आयकॉन्‍स स्‍वत:ला व्‍यक्‍त करण्‍याचा मोठा भाग बनले आहेत, विशेषत: मनातील भावना शब्‍दांमध्‍ये व्‍यक्‍त न करता येणाऱ्या क्षणांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये लोकप्रिय अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, “संवाद म्‍हणजे फक्‍त गप्‍पागोष्‍टी करणे नाही, तर त्‍यामधून आपल्‍या भावना व्‍यक्‍त होतात आणि इमोजी त्‍यासंदर्भात येणारे अडथळे उत्तमरित्‍या दूर करतात. कधी-कधी, दीर्घकाळपर्यंत शूटिंगनंतर मोठा मेसेज टाइप करण्‍यासाठी मला कंटाळवाणे वाटते, पण साधा स्‍माइलिंग इमोजी किंवा फोल्‍डेड हँड्स इमोजी सर्वकाही सांगून जातो. मला खासकरून उत्‍साही व फुलांचे इमोजी वापरायला आवडते. ते माझ्या मेसेजमध्‍ये सकारात्‍मकता व मोहकतेची भर करतात. अभिनेत्री असल्‍याने भावना व्‍यक्‍त करणे माझी कला आहे आणि इमोजी आपल्‍या डिजिटल जीवनामध्‍ये करणारी मदत पाहून खूप आनंद होत आहे. ते संवादांमध्‍ये उत्‍साह, विनोद आणि आरामदायीपणाची भर करतात, ज्‍यामुळे परस्‍परसंवाद अधिक वास्‍तविक वाटतो.”     

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…