मोदी यांच्या दौऱ्यातून राजकीय प्रचाराचा शुभारंभ! मुंबई : शिवडी- न्हावाशेवा अटल सागरी सेतूसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन, नाशिकमधील युवा महोत्सवाला उपस्थिती, नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे दर्शन यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढविणार आहेत. भाजप व मित्र पक्षांना राजकीय लाभ होईल अशा पद्धतीनेच मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन …