no images were found
तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील:
अमित शाह
दिल्लीतील भारत मंडप येथे भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करताना केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील हे देशाने ठरवले आहे, यात शंका नाही.’
आज जगात कुठेही गेलात तर लोक विचारतील की तुम्ही मोदींच्या भारतातून आला आहात का? 75 वर्षात या देशाने 17 लोकसभा निवडणुका, 22 सरकारे आणि 15 पंतप्रधान पाहिले आहेत. देशातील प्रत्येक सरकारने आपापल्या काळात कालसुसंगत विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज कोणत्याही संभ्रमाशिवाय म्हणता येईल की, सर्वांगीण विकास, प्रत्येक क्षेत्राचा विकास आणि प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचे काम हे नरेंद्र मोदीजींच्या 10 वर्षातच झाले आहे.
मोदीजींनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात, घराणेशाही, जातिवाद आणि तुष्टीकरण नष्ट केले आणि देशात ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’ स्थापित केले. देशाच्या चिन्हांवरील ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या सर्व खुणा हळुहळू काढून टाकण्याचे काम केले आहे. भारतीय राजकारणातील चाणक्य शाह पुढे म्हणाले की, ही कामे स्वातंत्र्यानंतर लगेच व्हायला हवी होती. मात्र, काँग्रेसने यासाठी कधीच प्रयत्न केला नाही.
जसे पूर्वीचे पांडव आणि कौरव दोन छावण्यांमध्ये विभागले गेले, त्याचप्रमाणे आजही दोन छावण्या आहेत. एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएची युती आहे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व घराणेशाही पक्षांची अहंकारी आघाडी आहे. ही अहंकारी युती भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घालते आणि भाजप आणि एनडीए युती ही नेशन फर्स्ट या तत्त्वावर चालणारी युती आहे. नेशन फर्स्ट हा आपल्या युतीचा आधार आहे, तर दुसरीकडे असे पक्ष आहेत जे आपल्या कुटुंबाची काळजी घेतात.
ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने अनेक घोटाळे केले, त्याचप्रमाणे आज आम आदमी पार्टी देखील दारू घोटाळा, मोहल्ला क्लिनिक घोटाळा करून न्यायालयापासून पळ काढत आहे. छत्तीसगडमध्ये महादेव घोटाळा झाला, लालूजींना शिक्षा झाली, संपूर्ण आय.एन.डी.आय आघाडी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, जनादेश मोदींना द्यायचा की आय.एन.डी.आय आघाडीला हे देशातील जनतेने ठरवायचे आहे.
याशिवाय गृहमंत्री अमित शाह जी म्हणाले की, मोदीजी देशातील गरिबांसाठी काम करत आहेत, तर दुसरीकडे असे पक्ष आहेत ज्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान भारताचे ध्येय ठेवत आहेत, पण राजकारणात आय.एन.डी.आय युतीचे उद्दिष्ट काय आहे?
“सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान करणे, पवार साहेबांचे उद्दिष्ट आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे, ममता दीदींचे उद्दिष्ट आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री बनवणे. तर स्टॅलिन, लालू यादव आणि उद्धव ठाकरे यांचेही आपल्या मुलाला सीएम बनवण्याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव यांनी आपल्या मुलाला आधीच मुख्यमंत्री बनवले होते. या सर्वांचे उद्दिष्ट फक्त सत्ता मिळवणे आहे. अशा स्थितीत हे पक्ष गरिबांच्या हिताचा कधी विचार करतील का?…कधीच नाही.