
no images were found
‘पीअँडजी शिक्षा’ची २० वर्षपूर्ती
गोवा,: व्हिस्पर, टाइड आणि जिलेट आदी ब्रॅण्ड्सचे निर्माता प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया (पीअँडजी इंडिया) पीअँडजी शिक्षा या त्यांच्या फ्लॅगशिप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कार्यक्रमाची २० वर्षपूर्ती साजरी करत आहे. राष्ट्रीय सीएसआर कायदा लागू होण्याच्या आधीच, २००५ साली पीअँडजी शिक्षा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. शाळांमधील पायाभूत सुविधा वाढवून दुर्लक्षित समुदायांतील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.
या २ दशकांच्या काळात पीअँडजी शिक्षाने शिक्षण हेच प्रमुख प्रभावक्षेत्र मानून त्यावर एकाग्रतेने काम केले आहे. या प्रभावक्षेत्रात ‘शिक्षा’द्वारे सुरुवातीला केवळ शालेय पायाभूत सुविधा बांधण्यावर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हापासून उत्क्रांत होत या कार्यक्रमाने आता अध्ययन निष्पत्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. आज अध्ययनातील तफावतींचा प्रतिबंध करण्याच्या तसेच त्यावर उपाय करण्याच्या माध्यमातून मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढवण्याच्या दिशेने ‘शिक्षा’चे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक मुलाला त्यांच्या इयत्तेनुसार संकल्पनांचे आकलन झाले पाहिजे याची खात्री या कार्यक्रमाद्वारे केली जाते. गेल्या २० वर्षांत पीअँडजी शिक्षाने हजारो समुदायांमध्ये आणि शाळांमध्ये काम केले आहे आणि त्यामुळे ५० लाखहून अधिक मुलांच्या आयुष्यांवर प्रभाव पडला आहे.
इंटरनॅशनल डे ऑफ व्हॉलंटीयर्सचे औचित्य साधून हा टप्पा पार केल्याचे साजरीकरण कंपनीने सुरू केले. देशभरातील अनेक ठिकाणी काम करणारे पीअँडजी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, एजन्सी पार्टनर्स, वितरक व स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी अशा १०० हून अधिक स्वयंसेवकांनी एकत्र येऊन भारतातील सर्वांत मोठे स्वयंसेवा अभियान या दिवशी राबवले.
वेगवेगळ्या ठिकाणांच्या विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करण्यासाठी खास विकसित केलेल्या अध्ययन प्रारूपांच्या माध्यमातून या स्वयंसेवकांनी शेकडो मुलांसोबत काम केले. लहान मुलांची भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे, सहयोगात्मक कथालेखनाची तंत्रे विकसित करणे, करिअरच्या वैविध्यपूर्ण मार्गांबाबत जागरूकतेला चालना देणे, विज्ञानातील विस्मयकारक बाबी मुलांना आपल्याशा वाटतील अशा पद्धतींनी समजावून देणे यांवर या प्रारूपांचा भर आहे. स्टेम शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक सहाय्य व मेंटॉरशिप पुरवणाऱ्या पीअँडजी बेटीयां स्कॉलरशिप कार्यक्रमातील शिष्यवृत्तीधारक मुलींच्या विशेष गटासाठी रेझ्युमे लेखन, मुलाखतीसाठी सूचना व मेंटॉरशिपद्वारे दिली जाणारी माहिती यांवर आधारित सत्रे घेण्यात आली.
पीअँडजी गोव्यामधील इंडस्ट्रीयल झोनमध्ये अत्याधुनिक उत्पादन प्लांटचे कार्यसंचालन पाहते, जेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूका करण्यासोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होत आहेत. तसेच, पीअँडजी शिक्षाच्या माध्यमातून कंपनी शिक्षणाप्रती दीर्घकाळपर्यंत कटिबद्ध आहे, जो राज्य व देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाप्रती योगदान देण्याचा त्यांचा मार्ग आहे. याचा भाग म्हणून, पीअँडजी शिक्षा शैक्षणिक पायाभूत सुविधा दृढ करणे आणि राज्यातील शिक्षणाच्या माध्यमातून वंचित समुदायांचे सक्षमीकरण अशा लक्ष्यित उपक्रमांच्या माध्यमातून हजारो मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे.
पीअँडजी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार वेंकट सुब्रमणियन यावेळी म्हणाले, “पीअँडजी ब्रॅण्ड्स आणि पीअँडजी कर्मचारी आसपासच्या समुदायांचे दैनंदिन आयुष्य सुधारणाऱ्या अर्थपूर्ण कृतींच्या माध्यमातून मदत करण्यासाठी बांधील आहेत. आमच्या कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून संस्थापकांनी याला प्राधान्य दिले आहे. पीअँडजी शिक्षा कार्यक्रमातून ही बांधिलकी तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समुदायांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभावाला चालना देण्याप्रती आमची सातत्यपूर्ण महत्त्वाकांक्षा दिसून येते. कामाची व प्रभावाची दोन दशके साजरी करणे हा अभिमानास्पद क्षण आहे. तेव्हा, आपला उत्सव साजरा करण्याची वेळ आली असताना, आम्हाला आमच्या दोन भक्कम आधारस्तंभांपासूनच सुरुवात करायची होती. हे आधारस्तंभ म्हणजे आमचे कर्मचारी आणि आम्ही ज्यांना सेवा देतो, ज्यांच्यात राहतो, ज्यांच्यात काम करतो ते समुदाय. शिक्षा कार्यक्रमाची २० वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी आमचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व सहयोगी ज्या कळकळीने एकत्र आले, ते बघणे अत्यंत प्रेरणादायी होते. आमचे कर्मचारी या कार्यक्रमाशी किती घट्ट जोडलेले आहेत याची पावती या स्वयंसेवा मोहिमेतून मिळाली.”
पीअँडजी शिक्षाच्या २० वर्षपूर्ती उत्सवाची सुरुवात या महत्त्वाच्या उपक्रमाद्वारे झाली. समावेशक शिक्षणाला चालना देणे, अर्थपूर्ण संवाद जोपासणे आणि भारतभरातील कोट्यवधी मुलांच्या अधिक उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करणे यांप्रती कंपनीचे समर्पण यातून अधोरेखित झाले.