Home मनोरंजन कलाकार त्‍यांच्या जीवनप्रवासाला आकार दिलेल्‍या पुरुषांबाबत सांगत आहेत!

कलाकार त्‍यांच्या जीवनप्रवासाला आकार दिलेल्‍या पुरुषांबाबत सांगत आहेत!

4 min read
0
0
16

no images were found

कलाकार त्‍यांच्या जीवनप्रवासाला आकार दिलेल्‍या पुरुषांबाबत सांगत आहेत!

इंटरनॅशनल मेन्‍स डे आपल्‍या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्‍या पुरूषांना प्रशंसित व सन्‍मानित करण्‍याची आठवण करून देतो. एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार या दिनानिमित्त त्‍यांच्‍या जीवनातील उल्‍लेखनीय पुरूषांना सन्‍मानित करत आहेत, जे त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्‍यांच्‍या जीवनप्रवासाला आकार दिला आणि अविरत पाठिंबा दिला. हे कलाकार आहेत नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्‍णा देवी वाजपेयी), स्मिता साबळे (मालिका ‘भीमा’मधील धनिया), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील राजेश) आणि शुभांगी अत्रे (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी). मालिका ‘अटल’मध्‍ये कृष्‍णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ”इंटरनॅशनल मेन्‍स डे निमित्त मी माझ्या जीवनातील अविश्‍वसनीय पुरूष म्‍हणजेच माझे पती ओमकार यांना प्रशंसित करू इच्छिते. ते माझा आधारस्‍तंभ, विश्‍वासू आणि मोठे समर्थक राहिले आहेत, जीवनातील चढ-उतारादरम्‍यान माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. माझ्यावरील त्‍यांचा अतूट विश्‍वास आणि सतत प्रोत्‍साहन माझी ताकद व यशामागील प्रेरकस्रोत राहिले आहेत. आमच्‍या जीवनातील गोंधळांदरम्‍यान त्‍यांनी मला शांत ठेवण्‍यासोबत मार्गदर्शन केले आहे. मी नेहमी त्‍यांचे ऐकते, त्‍यांची मदत घेते आणि त्‍यांच्‍याकडून प्रेरणादायी शब्‍द ऐकण्‍यास उत्‍सुक असते. त्‍यांनी मला नात्‍याचा खरा अर्थ शिकवला आहे, ज्‍यामधून दिसून येते की प्रेम व पाठिंबा आम्‍हाला प्रबळ करू शकतात. त्‍यांची उपस्थिती आमच्‍या जीवनात आनंद, स्थिरता व उत्‍साह आणते. आज, मी माझ्या पतीसोबत सर्व पुरूषांचा देखील सन्‍मान करते, ज्‍यांनी त्‍यांच्‍या कुटुंबांप्रती स्‍वत:ला झोकून दिले आहे, ज्‍यासाठी त्‍यांना कधी-कधी सन्‍मान मिळत नाही. ते आपल्‍याला आठवण करून देतात की खरी ताकद मोठ्या गेस्‍चर्समध्‍ये नाही तर प्रेम व दयाळूपणाच्‍या कृत्‍यामध्‍ये सामावलेली आहे.” मालिका ‘भीमा’मध्‍ये धनियाची भूमिका साकारणाऱ्या स्मिता साबळे म्‍हणाल्‍या, ”मी माझ्या जीवनातील सर्वात अविश्‍वसनीय पुरूषाचा विचार करते तेव्‍हा मला खूप धन्‍य वाटते आणि तो पुरूष म्‍हणजे माझे वडिल. त्‍यांनी नेहमी मला पाठिंबा दिला आहे, माझे मार्गदर्शक व मोठी ताकद राहिले आहेत. आजही, मी त्‍यांच्‍यासोबत राहते आणि त्‍यांची काळजी घेते. मी दररोज त्‍यांच्‍याकडून मार्गदर्शन व प्रेरणा घेते. मोठी होत असताना त्‍यांनी माझ्यामध्‍ये स्थिरता, दयाळूपणा व आत्‍मविश्‍वास बिंबवला. त्‍यांची ताकद व अविरत प्रेमामुळे मी आज जे कोणी आहे ते घडले आहे आणि मला ख-या पाठिंब्‍याची शिकवण दिली आहे. आता आमच्या भूमिका बदलल्‍या आहेत. पूर्वी ते माझी काळजी घ्‍यायचे आणि आता मी त्‍यांची काळजी घेते. आम्‍ही शेअर केलेला प्रत्‍येक क्षण आमच्‍यामधील दृढ नात्‍याची आठवण करून देतो, ज्‍यामध्‍ये प्रेम, आदर व सखोल समंजसपणा सामावलेला आहे. या खास दिनानिमित्त मी माझे वडिल व सर्व पुरूषांचा सन्‍मान करते, जे त्‍यांच्‍या कुटुंबांसाठी आधारस्‍तंभ आहेत.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये कटोरी अम्‍माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी म्‍हणाल्‍या, ”माझा मुलगा कट्यायनकडे पाहिल्‍यानंतर मला माझ्या जीवनप्रवासाची आठवण होते. तो माझा आधारस्‍तंभ, ताकद व आशेचा स्रोत आहे, विशेषत: माझ्या पतीच्‍या निधनानंतर माझी खूप काळजी घेत आहे. जोडीदाराला गमावणे अत्‍यंत दु:खद आहे, पण माझ्या मुलाने मला मोठा आधार दिला, जे व्‍यक्‍त करण्‍यासाठी माझ्याकडे शब्‍दच नाहीत. आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये त्‍याने आमचे घर आनंदाने भरून टाकले आणि आमच्‍या कुटुंबाचा आधारस्‍तंभ बनला. त्‍या अवघड काळात, त्‍याने प्रेम, परिपक्‍वता व स्थिरता दाखवली, ज्‍यामधून मला त्‍याच्‍या वडिलांच्‍या उत्‍साहाची आठवण झाली. त्‍याने कोणताही संकोच न करता जबाबदाऱ्या घेतल्‍या, पाठिंबा देण्‍यासोबत शांतता व स्थिरता दिली, ज्‍यामुळे मला माझे काम करण्‍यास मदत झाली. त्‍याचा दयाळूपणा व शांतमय स्‍वभाव पाहून मला मन:शांती मिळाली आहे आणि माझे दु:ख दूर करण्‍याची त्‍याची क्षमता व माझ्या आठवणी दररोज मला आरामदायीपणा देतात. आज, मी त्‍याचा व सर्व पुरूषांचा सन्‍मान करते, जे ताकद व दयाळूपणासह त्‍यांच्‍या कुटुंबांना आधार देतात. माझ्या मुलासारखी मुले प्रेमाची ताकद आणि मानवी उत्‍साहाची स्थिरता आठवण करून देतात.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”माझे वडिल माझे आधारस्‍तंभ, मार्गदर्शक आहेत आणि त्‍यांनी मला स्थिरता, दयाळूपणाची शिकवण दिली. आज, ते त्‍यांच्‍या जीवनातील सर्वात आव्‍हानात्‍मक संघर्षाचा धैर्याने सामना करत आहेत, त्‍यांना कर्करोग झाला आहे. जीवनातील त्‍यांचे प्रयत्‍न पाहून शौर्य व धाडसाची शिकवण मिळते. कर्करोगामुळे त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक आरोग्‍यावर परिणाम झाला असताना देखील त्‍यांचा उत्‍साह थांबलेला नाही. अवघड काळामध्‍ये त्‍यांची अविरत सकारात्‍मकता मला प्रेरित करत आहे. त्‍यांच्‍या क्षमतेच्‍या माध्‍यमातून ते मला प्रति‍ष्‍ठा व स्थिरतेसह जीवन जगण्‍याची खरी शिकवण देत आहेत. यंदा इंटरनॅशनल मेन्‍स डे निमित्त मी माझे वडिल, तसेच सर्व वडिल, भाऊ व मुलांचा गौरव करते, जे शौर्य व शक्‍तीसह जीवनातील प्रतिकूल स्थितींचा सामना करत आहेत. माझे वडिल माझे हिरो आहेत, तसेच मला उद्देश व दयाळूपणासह जीवन जगण्‍याच्‍या खऱ्या अर्थाची आठवण करून देतात.”  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…