Home शैक्षणिक तंत्रज्ञान अधिविभागामार्फत मतदान जनजागृती अभियान

तंत्रज्ञान अधिविभागामार्फत मतदान जनजागृती अभियान

0 second read
0
0
22

no images were found

तंत्रज्ञान अधिविभागामार्फत मतदान जनजागृती अभियान

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ निमित्त मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. सदर अभियान राबविण्यास कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र.कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानाअंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा प्रारंभ प्र.संचालक प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रॅलीमध्ये विभागातील विद्यार्थी व शिक्षक यांनी भाग घेतला.
मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सदर अभियान घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगले , तंत्रज्ञान अधिविभाग राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरविंद मडावी व प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. या प्रसंगी प्रा.उदय पाटील , प्रा. डॉ. इराण्णा उडचान , प्रा. डॉ. दौलत नांगरे, प्रा. अमर डूम, प्रा. पूजा माने , प्रा. वैशाली मोहिते, प्रा. निकिता दिंडे , प्रा. डॉ. जमीर बागवान व विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…   कोल्हापूर (प्रतिनिधी):…