no images were found
शिक्षकांसाठी “खानमिगो”ॲप लाँच
खान अकॅडमी ही कोणालाही, कुठेही मोफत, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध असलेली जागतिक ना-नफा संस्था असून खान अकॅडमीने त्यांचे AI टूल ‘खानमिगो’, भारतातील सर्व शिक्षकांसाठी मोफत लाँच करण्याची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबर 2024 पासून याची सुरवात होत आहे. या लाँचचा एक भाग म्हणून, शिक्षकांना ‘खानमिगो’ या टूलमध्ये ‘शिक्षण सहाय्यक’ म्हणून विनामूल्य प्रवेश करता येईल. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ‘खानमिगो’ उपलब्ध असून हे एक AI पॉवर शिक्षक सहाय्यक टूल आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सोपे व्हावे, शिक्षकांची उत्पादकता वाढावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण वृद्धिंगत व्हावे याकरिता हे डिझाइन केलेले आहे. खान अकॅडमी नेहमीच वचनबद्ध आहे की उच्च-गुणवत्तेची शैक्षणिक संसाधने सर्व भाषांमध्ये उपलब्ध व्हावी आणि त्यांचा प्रभावीपणे वापर व्हावा.
शिक्षकांना खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर ‘खानमिगो’ यामध्ये विनामूल्य प्रवेश मिळेल, आणि यासोबतच त्यांचा शैक्षणीक प्रवास सुव्यवस्थित करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक सहभागास मदत करण्यासाठी आणि वर्गातील शिक्षण वृद्धिंगत करण्यासाठी हे AI टूल सुसज्ज असेल. जगभरातील शिक्षकांनी वापरलेले ‘खानमिगो’ हे टूल, विविध काठिण्य पातळ्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यांचे शालेय अभ्यासक्रमाशी संरेखित मूल्यमापन करणे, सर्जनशील कल्पना सुचवणे आणि शिक्षण सामग्रीचा सारांश उपलब्ध करून देणे यासारखी अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. या टूलसह, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांवर अधिक लक्ष देऊन इतर प्रशासकीय कामांवरचा भार कमी करू शकतात, ज्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सूचना अधिक प्रभावी होतात.
खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका (MD) स्वाती वासुदेवन यांनी या लाँचबद्दल उत्साह व्यक्त केला आहे: “बालदिनाच्या या विशेष प्रसंगी, आम्ही भारतातील सर्व शिक्षकांना ‘खानमिगो’ अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. खान अकॅडमीमध्ये, आम्हाला असा विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता अनलॉक करण्यासाठी शिक्षक हे गुरुकिल्ली आहेत, आणि ‘खानमिगो’ लाँच करून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिकृत आणि प्रभावी शैक्षणिक अनुभव तयार करण्यासाठी शिक्षकांना अधिक सक्षम करत आहोत. आमचे उद्दिष्ट आहे की तंत्रज्ञानाच्या प्रवेशातील अडथळे दूर करणे, शिक्षकांना भारतातील मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना पाठिंबा देणे.”
इतर देशांमध्ये सुद्धा उपलब्ध असलेले ‘खानमिगो’ हे भारतातील शिक्षकांसाठी एक विनामूल्य साधन म्हणून उपलब्ध झालेले असून, तंत्रज्ञानाच्या जोडीने शैक्षणिक संधींचा विस्तार करणे या खान अकॅडमीच्या ध्येयातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतातील शिक्षक खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर शिक्षक खाते तयार करून हे AI टूल मोफत मिळवू शकतात, ज्यामुळे त्यांचा शैक्षणिक अनुभव वाढेल तसेच त्यांना शिक्षक सहाय्यक प्राप्त होईल.
खानमिगोचे हे प्रायोगिक स्वरूप असून, खान अकॅडमी हे ओळखते की या टूलची अंमलबजावणी ही प्रगतीपथावर आहे आणि त्यात सतत सुधारणा होत आहेत. तसेच वास्तविक-जगातील त्याचा वापर आणि मार्गदर्शनाने यात अधिक सुधारणा अपेक्षित आहेत. डिजीटल साक्षरता, क्रिटिकल थिंकिंग आणि AI चा जबाबदार वापर यासारखी कौशल्ये वाढवून खानमिगोशी विचारपूर्वक चर्चा करणे यासाठी आम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहोत. india.khanacademy.org या संकेतस्थळाला भेट देऊन खान अकॅडमीबद्दल अधिक जाणून घ्या आणि khanmigo.ai ला भेट देऊन ‘खानमिगो’ एक्सप्लोर करा.