
no images were found
तुमचे केस करा लग्नसमारंभासाठी सज्ज:
लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे आणि यात केवळ नवऱ्या मुलीलाच चमकायचे असते असे नाही! करवल्यांपासून ते मैत्रिणी आणि नातेवाइकांपर्यंत प्रत्येकीलाच छान दिसायचे असते. संगीत, मेहंदीसारखे सोहळे आणि भव्य रिसेप्शन या सगळ्याच प्रसंगी केस छान आवरावे लागतात. अनोखी ‘फॅशन स्टेटमेंट’ करण्यासाठी केशरचनेहून अधिक चांगला मार्ग नाही.
लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये केसांच्या रचना सफाईदारपणे करायच्या असतील, तर आधी ते केस मऊ आणि सहज आवरण्याजोगे असले पाहिजेत. मात्र, हिवाळा सुरू होत आहे आणि त्यातच वेगवेगळ्या समारंभांसाठी स्टायलिंगच्या साधनांचा वापर वाढत आहे. त्यामुळे केसावर जास्तच ताण आलेला असतो, या ताणामुळे ते शुष्क होतात, तुटतात. उत्सवाची वेळ जवळ येत असतानाच, केसाची जरा जास्त काळजी घेणे हा महत्वाचा मुद्दा आहे, केसाला नियमित तेल लावण्याच्या सवयीहून अधिक चांगले काहीच ठरत नाही. अनेक प्रकारची तेलं उपलब्ध असताना, आपल्या केसाला अनुकूल ठरतील अशा घटकांनी युक्त असलेले तेल निवडणे महत्त्वाचे आहे. पॅराशूट अॅडव्हान्स्ड एलोवेरा इनरीच कोकोनट हेअर ऑइल हा एक केस चिकट न करणारा, हलकाफुलका पर्याय आहे. यात कोरफडीची केस मुलायम करण्याची खासियत आणि नारळाचे पोषण यांचा संयोग साधण्यात आला आहे. त्यामुळे हे हेअर ऑइल केसातील गुंता कमी करते आणि केसांना मुलायम करते.
कोरफड घालून तयार केलेले खोबरेल तेलाचे हे अनोखे मिश्रण केसाच्या आतमध्ये १० स्तरांपर्यंत खोलवर* जाऊन मिसळते (अस्वीकृती- मुलभूत तांत्रिक अभ्यास) आणि केसांना मुलायम करून गुंता कमी करते. कोरफड ही वनस्पती केसाचे एकंदर आरोग्य सुधारणारा घटक म्हणून परिचित आहे. नारळातील उत्कृष्ट पोषणाशी कोरफडीतील केसांची स्थिती सुधारण्याच्या गुणधर्माचा मेळ घातला गेल्यामुळे केसात गुंता कमी होतो आणि परिणामी केस मुलायम व आकर्षक होतात. त्यामुळे आपल्याला केसाची हवी तशी रचना करण्याची तसेच अगदी सहजपणे ते हवे तसे ठेवण्याची मुभा मिळते.
प्रो टिप: तुम्ही हे हेअर ऑइल आठवड्यातून २-३ वेळा केसाला लावू शकता. माथ्यावर या तेलाने हलेकच मसाज करा आणि मग ते केसाच्या टोकांपर्यंत लावत जा, केस धुण्यापूर्वी केवळ ३० मिनिटे ते लावून ठेवा.
मुलायम आणि आवरलेल्या केसांसह आता लग्नसमारंभात कोणताही लूक करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात! संगीत समारंभात दिमाखदार अंबाडा घालण्यापासून ते मेहंदीमध्ये खेळकर वेणीपर्यंत कोणत्याही उत्सवी रचनेत तुमचे केस सहज बसतील. तेव्हा, लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच तुमच्या केसाची काळजी घेण्यासाठी नारळ व कोरफडीचा परिपूर्ण संयोग असलेल्या हेअर ऑइलने केसाला नियमितपणे मसाज करण्याची सवय लावून घ्या आणि अप्रतिम केशरचनांसाठी केस सज्ज करा.