
no images were found
भाजपा उत्तर भारतीय मोर्चा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात उत्तर भारतीय मोर्चा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री प्रद्युमन शुक्ला, उत्तर भारतीय मोर्चा कोल्हापूर प्रभारी शशिकांत पांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, मोर्चा अध्यक्ष रामसिंह मोर्या, उत्तर भारतीय मोर्चा प्र.का सदस्य अशोक रामचंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोर्चा सरचिटणीस बृजेश उपाध्याय यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ठ केली. आजच्या या बैठकी प्रसंगी उत्तर भारतीय मोर्चा महानगरच्या २६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये ३ सरचिटणीस, ३ उपाध्यक्ष, १० चिटणीस, ३ मंडल अध्यक्ष, १ आय.टी संयोजक , ६ सदस्य असा समावेश आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री प्रद्युमन शुक्ला उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, संपूर्ण जगभरात आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते व देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी देशाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामन्य नागरिकांच्या पर्यंत उत्तर भारतीय मोर्च्याच्या माध्यमातून पोहोचवल्या पाहिजेत यासाठी शहर स्तरावर उत्तर भारतीय मोर्चा कार्यकारणीचे संघटन मजबूत करून आपल्या कामातून आपल्या मोर्चाची एक वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी सातत्याने सर्वांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.उत्तर भारतीय मोर्चा कोल्हापूर प्रभारी शशिकांत पांडे बोलताना म्हणाले, मोर्चा प्रभारी या नात्याने आपला सहकारी म्हणून आपल्या सोबत सातत्याने संपर्कात राहणार असून शहरामध्ये उत्तर भारतीय मोर्चाचे संघटन वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत व अभिनंदन करत उत्तर भारतीय मोर्चाच्या आगामी कार्यक्रमासाठी सर्वते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी निरंजन झा, प्रभाकर तिवारी, निलेश डांगरा, अजित सिंग, रामकरण प्रसाद, कमलेश पांडे, राजवीर शर्मा, ललन कुमार, राजधर तिवारी, अरविंद मिश्रा, मंगल विष्णोई, संतोष सिंग, सुनील मिश्रा, कमलेश ओसवाल, उमेश निषाद, सुखवीर शर्मा, अजय झा, शंभूनाथ मिश्रा, सुजित मिश्रा, सुरेश झा, विजय भरतद्वाज, धर्मवीर भरतद्वाज, राकेश सिंग ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.