कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा, कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी …