no images were found
विभुती नारायण मिश्रा बनला फोटोग्राफर!
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ नॉन-स्टॉप विनोदी क्षणांना सादर करते, जे पाहून तुम्ही हसून-हसून लोटपोट व्हाल. पात्रं नेहमी धमाल स्थितींमध्ये अडकतात आणि प्रेक्षकांना अचंबित करतात. आता प्रेक्षकांना हास्याचा नवीन स्तर अनुभवायला मिळणार आहे, जेथे आसिफ शेख यांनी साकारलेली भूमिका विभुती नारायण मिश्रा फोटोग्राफर बनतो. या नवीन एपिसोडबाबत आपला आनंद व्यक्त करत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ‘‘मला मालिकेमध्ये मिळणारे अविश्वसनीय पात्र साकारायला आवडते आणि त्याचा मी भरपूर आनंद घेतो. यामधून अविरत मनोरंजनाचा आनंद मिळतो. फक्त कथानकाला फॉलो करू नका. मी पुढील एपिसोडमध्ये माझ्यात काय विलक्षण बदल होतील हे पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे (हसतात). मी आमच्या अद्भुत लेखकांचे आभार मानतो, ज्यांनी करिष्माईरित्या मला भूमिकांमध्ये सामावून घेतले आहे आणि मला त्या भूमिका साकारायला आवडतात. माझ्या परफॉर्मन्सनी प्रेक्षकांना अचंबित केले आहे. चालू असलेल्या कथानकामध्ये मी फोटोग्राफर बनलो आहे, जो लेन्समागील क्षणांना कॅप्चर करतो. या एपिसोडमध्ये कथानक पुढे सरकते तसे अनिता (विदिशा श्रीवास्तव) विभुतीचे उल्लेखनीय फोटोग्राफी कौशल्ये पाहून प्रभावित होते आणि त्याला फोटोग्राफी स्टुडिओ उघडण्याचा सल्ला देते. एकत्र ते तिवारीकडे (रोहिताश्व गौड) जाऊन त्याचे दुकान भाड्याने देण्याबाबत चौकशी करतात आणि तिवारी ते मान्य करतो. विभुती त्याच्या नवीन उद्घाटन केलेल्या स्टुडिओमध्ये अंगूरीचे (शुभांगी अत्रे) स्वागत करतो, तिचे सुंदर फोटोग्राफ्स काढतो. पण, विभुती तिवारीला ८,००० रूपयांचे बिल देतो तेव्हा तिवारीला राग येतो. अंगूरी विभुतीला तिच्या घरी येऊन रात्रीच्या वेळी तिचे व तिवारीचे रोमँटिक फोटो काढण्यास सांगते. विभुती कॅमेरासह आल्यानंतर तिवारीचा राग आणखी वाढतो आणि विभुतीला त्वरित त्याचे दुकान खाली करण्यास सांगतो.’’
या सीक्वेन्सचे शूटिंग करण्याच्या अनुभवाबाबत आसिफ शेख म्हणाले, ‘‘मी तितकेसे चांगल्याप्रकारे फोटो कॅप्चर करत नाही. आज लोक त्यांच्या फोन कॅमेऱ्यांनी सेल्फीज व इतर फिल्टर्स कॅप्चर करणे सामान्य बनले आहे. मी तसे करू शकत नाही. पण मला सांगावेसे वाटते की, या एपिसोडने माझ्यामध्ये फोटो काढण्याची आवड निर्माण केली. सीन्सदरम्यान डीएसएलआर कॅमेरा धरण्याच्या सरावाने मला ते सतत करण्यास भाग पाडले. मी सीन्सदरम्यान माझे सह-कलाकार आणि सेटवरील इतर सदस्यांचे फोटो काढले. मी ते फोटो चांगले होते असा दावा करणार नाही, पण मी काढलेले काही फोटो चांगले होते. लोक ते फोटो पाहून प्रभावित झाले (हसतात). आजच्या पिढीची फोटो काढणे व शेअर करण्याप्रती आवडीने फोटोग्राफीला अधिक उत्साहवर्धक केले आहे. पण मला आजही ते दिवस आठवतात, जेव्हा फोटोग्राफर्स बाग, निसर्गरम्य दृश्ये, आकाश व जंगल अशा अद्भुत पार्श्वभूमीसह सेटअप तयार करायचे आणि आपल्याला पोज द्यायला सांगायचे. आपण ते फोटो कसे असतील याची आतुरतेने वाट पाहायचो. माझ्या घरी असे फोटो काढलेला अल्बम आजही आहे, जो नेहमी खास असेल. शूटदरम्यान मी क्रिएटिव्ह फिल्टर्स आणि फॅन्सी फोन कॅमेरा टेक्निक्स आत्मसात केल्या, ज्या अस्तित्वात आहेत याबाबत मला माहित नव्हते. मी फोटोग्राफिक विश्वाच्या अद्भुत बाबींना जाणून घेत होतो. म्हणून मला सांगावेसे वाटते की, हा एपिसोड प्रेक्षकांचे मनोरंजन करेल आणि मला फोटोग्राफी सौंदर्याची जाणीव करून देईल. मी यासंदर्भात प्रो नसलो तरी या कलाप्रकाराबाबत जाणून घेण्याचा आणि काही संस्मरणीय क्षणांना कॅप्चर करण्याचा आनंद घेतला.