no images were found
घरफाळा विषेश कॅम्पमध्ये चार दिवसात 58 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी
कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विषेश कॅम्पमध्ये चार दिवसात 58 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतींवर (इमारतींवर) खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतींवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी सोमवार ते गुरुवार अखेर चार दिवसाच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसाच्या कॅम्पमध्ये एकूण 58 मिळकतींना घरफाळ आकारणी करुन देण्यात आली तर 18 मिळतींनी आपले अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची तपासणी करुन अपूर्ण कागदपत्र मागणी बाबत जागेवर नोटीस देण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांची पुर्तता होताच संबंधीत मिळतींना कराची आकारणी करुन दिली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत गुरुवारी छ.ताराराणी मार्केट येथे घरफाळा विभागाने विषेश कॅम्पमध्ये नवीन कर आकारणी करण्याकरीता 1 मिळकतधारकांने अर्ज सादर केला होता. तसेच मागील आठवड्या पर्यंत घरफाळा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण 7 अर्जदारांच्या कडून योग्य त्या कागदपत्राची पुर्तता करुन घेवून नवीन 7 मिळकतींची कर आकरणी अंतीम करुन देण्यात आली. यावेळी कर अधिक्षक विजय वणकुद्रे यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित नागरीकांचे तक्रारीचे निवारण केले. या कॅम्पला उप आयुक्त शिल्पा दरेकर व कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी मार्गदर्शन केले.