no images were found
“सेटवरील प्रत्येकाला माझा नववधूचा पोशाख कियारा अडवाणीच्या पोशाखा सारखा वाटला!” -मुग्धा चापेकर
मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि रणबीर (कृष्णा कौल) आणि प्राची (मुग्धा चापेकर) यासारख्या व्यक्तिरेखांचे अस्सल चित्रण यामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती मालिका बनली आहे. रणबीर आणि मुग्धाच्या जीवनातील कलाटण्यांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा सतत वाढवीत ठेवली आहे. गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले की प्राची आणि अक्षय (अभिषेक मलिक) यांचे लग्न थांबविण्यासाठी रणबीरने रियाशी (टिना फिलिप) लग्न करण्याचा निर्णय स्थगित केल्यामुळे सारा डाव पालटला आहे. पण तो प्राची-अक्षयच्या विवाहाच्या स्थळी पोहोचताच बेशुध्द होऊन कोसळतो. परिणामी प्राचीचे अक्षयबरोबर लग्न होते.
मालिकेतील या विवाहाच्या प्रसंगात बर््याच नाट्यपूर्ण घटना घडल्या असल्या, तरी यावेळी मुग्धाने परिधान केलेल्या नववधूच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा पोशाख घालून मुग्धा तिच्या मेक-अप रूममधून बाहेर आल्यावर तिच्या सहकलाकारांना आणि कर्मचार््यांना एक गोष्ट तात्काळ लक्षात आली आणि ती म्हणजे तिचा हा पोशाख अभिनेत्री कियारा अडवाणीच्या वधूच्या पोशाखाशी खूपच मिळताजुळता होता. मुग्धाने यावेळी पारंपरिक वधूचा पोशाख घालण्याऐवजी फिक्या गुलाबी रंगाचा लेहेंगा नेसला होता. त्या लेहेंग्याच्या रंगसंगतीशी सुसंगत असा तिने हिरव्या रंगाचा हार गळ्यात घातला होता, तसेच हातात हिरवा चुडा आणि केसांत गजरा माळला होता. तिला या पोशाखात पाहून सेटवरील सर्वांनी तिची खूप प्रशंसा तर केलीच, पण तिने सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे प्रसृत केल्यावर असंख्य चाहत्यांनीही तिची खूप स्तुती केली.
मुग्धा चापेकर म्हणाली, “मालिकेत वधूचा पोशाख परिधान करणं ही माझ्यासाठी आता नवी गोष्ट राहिलेली नाही. पण यावेळी मला सर्वात आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की माझा हा पोशाख कियारा अडवाणीने तिच्या लग्नात घातलेल्या पोशाखाशी खूपच साधर्म्य साधणारा होता. लग्नाच्या या प्रसंगासाठी इतका श्रीमंती थाटाचा आणि देखणा पोशाख तयार केल्याबद्दल मी माझ्या क्रिएटिव्ह टीमला सारं श्रेय देईन. मी हा पोशाख परिधान करून मेक-अप रूमच्या बाहेर येताच मला माझ्या लूकबद्दल सर्वांनी इतक्या वेळा अभिनंदन केलं. आता माझे प्रेक्षक आणि चाहत्यांना मालिकेत हा पोशाख कधी एकदा दाखविते, असं मला झालं आहे.”
या देखण्या नववधूच्या पोशाखासाठी मुग्धावर अभिनंदनाचा वर्षाव झाला असला, तरी आपल्या जीवनाचं प्रेयसीचे दुसर््या व्यक्तीबरोबर लग्न झाल्याचे पाहिल्यावर रणबीरची प्रतिक्रिया काय होईल? लग्नाच्या मंडपात आपल्याला सोडून गेल्याबद्दल रिया रणबीरला माफ करील का?आगामी भागांमध्ये काय घडेल, हे जाणून घेण्यासाठी पाहात राहा कुमकुम भाग्य.