Home राजकीय एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

0 second read
0
0
47

no images were found

एकनाथ शिंदेंना काय मिळणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी सीएमपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र त्याग करणाऱ्या शिंदेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्यामुळे शिंदेंची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशी ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जातं. मात्र मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर ‘उप’ जबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला संधी देण्याचं शिंदेंच्या मनात आहे. त्याचप्रमाणे फडणवीस २.० मंत्रिमंडळात सहभागी होऊन हेविवेट खाते पदरात पाडून घेण्यासाचाही त्यांचा मानस असल्याचे बोलले जाते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…

स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम…     जागतिक पर्यावरण …