
no images were found
तंत्रज्ञान अधिविभागात नॅसकॉमतर्फे डेटा अँड फंक्शनल नॉलेज विषयावरती सेमिनार
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ व नॅसकॉम यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत तंत्रज्ञान अधिविभागातील तृतीय व चतुर्थ वर्षाच्या कॉम्प्युटर तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील विद्यार्थ्यांच्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात आला. नॅसकॉम ही कॉम्प्युटर व आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली एक शिखर संस्था आहे. या संस्थेच्या जगभर ३००० कंपन्या सदस्य आहेत. त्यामध्ये अगदी स्टार्टअप ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे . या संस्थेबरोबर शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार आहे.
सदर करार प्रत्यक्षात येण्यास कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र.कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गणेश पाटील (
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर ,तंत्रज्ञान अधिविभाग ) यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामंजस्य करारासाठी विशेष प्रयत्न केले होते . या कराराअंतर्गत डेटा अँड फंक्शनल
नॉलेज या विषयावरती श्री. अभिषेक राठी (फाउंडर अँड सीईओ – विक्रेटिक टेक्नॉलॉजी ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये सॉफ्ट स्किल या विषयावरती
मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून दाखवली. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील असलेली तफावत सांधण्यासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञाने व उद्योग विश्वाच्या गरजा विद्यार्थ्यांच्या
लक्षात आणून देण्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. इथून पुढे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील अशी माहिती प्रभारी संचालक प्रा.डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली.
यापूर्वी या कराराअंतर्गत जनरेटिव्ह व प्रॉम्प्ट इंजीनियरिंग या विषयावरती डॉ. अमित आंद्रे ( फाउंडर अँड सीईओ , डेटाटेक लॅब – पुणे) यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते . दोन्ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. चेतन आवटी व प्रा. अमर डूम यांनी विशेष परिश्रम घेतले.