शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; कोल्हापूर (प्रतिनिधी): पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले आहेत. आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी जयंती असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा. शिवसेनाप्रमुख …