Home राजकीय महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

3 min read
0
0
22

no images were found

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाटशेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावीखासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्‍यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब दोषी व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात बोलताना, आज खासदार धनंजय महाडिक यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या एका महत्वाच्या विषयाकडे देशाचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची आणि खतांची विक्री होत असून, त्यातून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. बनावट आणि बोगस बियाण्यांमुळे पिकांची उगवण कमी होत असून, उत्पादनात मोठी घट होत आहे. त्यातून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. शिवाय बनावट खतांचा मुद्दाही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. अशा खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, पिकांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
शेतकरी मोठ्या आशेने बियाणे आणि खत खरेदी करतो, पण जर तेच निकृष्ट निघाले तर त्याला प्रचंड आर्थिक फटका बसतो. सरकारने बोगस बियाणे किंवा खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. बियाणे आणि खतांच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करावी, बाधित शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, शासकीय तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेतकर्‍यांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खासदार महाडिक यांनी संसदेत स्पष्ट केले. ज्या पध्दतीने तंबाखूविरोधी जाहिराती प्रसारीत केल्या जातात, त्याच पध्दतीने बनावट बियाणे आणि खतांविरोधातही शासनाने जनजागृती मोहीम सुरू करावी, अशी त्यांनी मागणी केली. शेतकर्‍यांच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रश्‍नाला खासदार महाडिक यांनी वाचा फोडली असून, आता सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहीले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…