no images were found
देशहिताच्या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सर्वपक्षाने समर्थन द्यावे-हेमंत पाटील :परिसीमन विधेयक लोकशाहीला अधिक बळ देणारे
पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणारे ‘परिसीमन विधेयक’ आणि देशाचा खर्च वाचवणारे ‘एक देश, एक निवडणूक’ (१२९वे संविधान संशोधन) यांसारखे ऐतिहासिक विधेयक सादर करणार आहे. याशिवाय, दोषी लोकप्रतिनिधींना ३० दिवसांत पद सोडावे लागणारा कठोर १३०वा संविधान संशोधन कायदा, ‘FCRA’ सुधारणा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयके पटलावर येणार असून ही बाब समाधानकारक असल्याचे पाटील म्हणाले.
सरकारचे समर्थन करणाऱ्या खासदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एप्रिल २०२६ च्या अर्थसंकल्पीय सत्रात एनडीएकडे २९३ खासदारांचे बळ होते. या अधिवेशनात ही संख्या ३१९ वर पोहोचली आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे २० बंडखोर आणि शिवसेना (UBT) च्या ६ खासदारांच्या पाठिंब्याचा समावेश आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, लोकसभेतील काही जागा रिक्त असल्याने दोन तृतीयांश बहुमताचा अर्थात ३६० जागांचा आकडा गाठणे आता सरकारला अधिक सोपे झाले आहे.
अर्थसंकल्पीय सत्रात एनडीए दोन तृतीयांश बहुमतापासून ५४ मतांनी दूर होती, परंतु आता ही तफावत अवघ्या १२ मतांवर आली आहे. सरकारकडे सध्या ३४८ मतांचे संभाव्य संख्याबळ असल्याने विरोधकांनी विनाकारण अडवणूक न करता, देशाच्या विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी या विधेयकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.