Home उद्योग एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

0 second read
0
0
8

no images were found

एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी डॅशबोर्ड’ उपलब्ध करून देण्यात आला असून, अॅप्लिकेशन्सना दिलेल्या विविध परवानग्या वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी पाहता, बदलता किंवा रद्द करता येणार आहेत.
डेटा सार्वभौमत्वाच्या दृष्टीने ‘सॉव्हरिन डेटा बाउंड्री’ लागू करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अॅप्लिकेशन्समधून होणारी १०० टक्के डेटा वाहतूक भारतात होस्ट केलेल्या पायाभूत सुविधांमधून केली जाते. प्रणालीद्वारे १,००० हून अधिक कनेक्शन्स आणि १७२ स्वतंत्र गंतव्य आयपींच्या सोर्स नियमांचे स्वयंचलित विश्लेषण केले जाते. मात्र, ऑपरेटिंग सिस्टमच्या मूलभूत कार्यांसाठी आवश्यक असलेल्या गुगलच्या काही कोअर सेवा कॅलिफोर्निया आणि सिंगापूरकडे निर्देशित केल्या जातात.
नव्या आवृत्तीत पार्श्वभूमीत कार्यरत अॅप्लिकेशन्सकडून संवेदनशील संसाधनांचा होणारा वापर समजण्याची सुविधा देण्यात आली आहे. अनावश्यक किंवा जास्त परवानग्यांबाबत ‘प्रायव्हसी अलर्ट’द्वारे वापरकर्त्यांना सूचित केले जाणार आहे.

‘प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.०’च्या माध्यमातून समीक्षक, पत्रकार, तंत्रज्ञानप्रेमी आणि नैतिक हॅकर्सना एआय+च्या उपकरणांची स्वतंत्र चाचणी घेण्याची संधीही कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!  शासनाचा पगार व…