Home विमा सलग चौथ्या वर्षी 99% पेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट; एडलवाइस लाइफचा आर्थिक वर्ष 2026 मध्ये 99.31% रेशो

सलग चौथ्या वर्षी 99% पेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट; एडलवाइस लाइफचा आर्थिक वर्ष 2026 मध्ये 99.31% रेशो

0 second read
0
0
11

no images were found

सलग चौथ्या वर्षी 99% पेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट; एडलवाइस लाइफचा आर्थिक वर्ष 2026 मध्ये 99.31% रेशो

कोल्हापूर(प्रतिनिधी):–:एडलवाइस लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2026 मध्ये 99.31 टक्के क्लेम सेटलमेंट रेशो नोंदवत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी कंपनीने 99 टक्क्यांपेक्षा अधिक क्लेम सेटलमेंट रेशो कायम राखला असून, आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या सर्व क्लेम्सचा निपटारा करून शून्य क्लेम प्रलंबितता साध्य केली आहे.
क्लेम सेटलमेंट रेशो हा विमा कंपनीकडे आलेल्या मृत्यू दाव्यांपैकी किती दावे निकाली काढले गेले, याचे प्रमाण दर्शविणारा महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यामुळे विमा कंपनीच्या विश्वासार्हतेचे आणि ग्राहकांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे हे महत्त्वाचे मोजमाप आहे.

कंपनीच्या ‘इन्स्टा-क्लेम्स’ उपक्रमांतर्गत पात्र क्लेम्सपैकी 84 टक्के क्लेम अवघ्या 24 तासांत निकाली काढण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत तातडीने मिळून कठीण काळात दिलासा मिळाल्याचे कंपनीने सांगितले.
मजबूत जोखीम मूल्यांकन, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहककेंद्रित सेवा यांच्या बळावर एडलवाइस लाइफने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली असून, गरजेच्या वेळी ग्राहकांचा विश्वास जपण्यावर कंपनीचा भर असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या &n…