Home गौरव सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

1 min read
0
0
13

no images were found

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी):- आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

            यावेळी कु.पृथ्वीराज किरण मोरे (नेपाळ येथे आयोजित ११ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेवून, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून रौप्य पदक पटकाविले बद्दल. तसेच मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक सुमित बाळासो खोत यांच्या ही उल्लेखनीय कार्याबद्दल). कु. समृध्दी महेंद्र कुंभार (विद्यापीठ राष्ट्रीय वुशू क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घेवून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकाविलेबद्दल). सतीश वडणगेकर (महिला सबलिकरणाच्या अनुषंगाने गेल्या २५ वर्षापासून महिलांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देवून महिला सक्षमीकरणात अत्यंत मोलाचे योगदान दिलेबद्दल)अविनाश पाटील (क्रिडा आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून अनेक खेळाडूंना मागदर्शन करून अनेक चांगले खेळाडू घडविले बद्दल). कु.तस्मीया मोहसिन सय्यद (स्केटिंग खेळामध्ये सह‌भाग घेवून सलग १ तास २६ मीनीटे २६ सेंकदात चांगले प्रदर्शन करून विक्रम नोंदविला या भरिव कामगिरीमुळे एशिएन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली या कार्याबद्दल). सागर बगाडे (दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स.म.लोहिया हायुस्कुलचे कला शिक्षक यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रथमच राष्ट्रपती पुरस्काराने गौरविणेचा मान त्यांना मिळालेबद्दल) या सर्वांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, आदिल फरास, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, आरोग्य विशेष समिती सभापती सुरेखा ओटवकर, उपसभापती वैभव माने, पाणी पुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगीता सावंत, उपसभापती सौ.दिपा काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुले, उपसभापती सौ.पुजा पोवार, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, नगरसचिव सुनील बिद्री, नगरसेवक/नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या &n…