Home Video छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करा ! – कोल्हापूर येथे निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करा ! – कोल्हापूर येथे निवेदन

8 second read
0
0
16

no images were found

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करा ! – कोल्हापूर येथे निवेदन

कोल्हापूर – गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक आणि नियोजित पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात अत्यंत खोटारडे, खालच्या पातळीवरील आणि जातीयवादी विष पसरवणारे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी रहित करावी आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, तसेच चुकीचा इतिहास पसरवल्याबद्दल त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदू महासभेचे श्री. मनोहर सोरप, भाजपचे एस्.बी. देवणे, हिंदू महासभा शहराध्यक्षा पूजा शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रकाश घाटगे, शशिकांत बीडकर, दीपक हारूगडे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

“उत्सवापासून कौटुंबिक क्षणांपर्यंत: सोनी सब कलाकारांनी गुढीपाडव्याचा उत्साह साजरा केला”

“उत्सवापासून कौटुंबिक क्षणांपर्यंत: सोनी सब कलाकारांनी गुढीपाडव्याचा उत्साह साजरा के…