भाजप संसदीय मंडळात मराठी नेता नसणे हा महाराष्ट्राचा अपमान : रेखी मुंबई : समाजकारणापासून राजकारणात अव्वल असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैली तसेच ‘व्हिजन’मुळेच जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षाला केंद्रासह अनेक राज्यात सत्तेवर बसवले आहे. देशासह जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन अशी ओळख पार्टीची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक वारसा घेवून राजकारणात यशस्वी झालेल्या भाजपला वाढवण्यात अनेक मराठी नेत्यांचे …