Home राजकीय शिंदे गटाकडून नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदाची नियुक्ती

शिंदे गटाकडून नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदाची नियुक्ती

0 second read
0
0
37

no images were found

शिंदे गटाकडून नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदाची नियुक्ती

जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि महानगर प्रमुख यांच्या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी ठाणे येथील संजय बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी आज त्यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी अधिकृतपणे नियुक्ती केली आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पक्ष बांधणीच्या कामाला वेग आला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपदी अनिल ढिकले आणि दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी भाऊलाल तांबडे यांची मागील आठवड्यात नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आता काल महानगरप्रमुखपदी नगरसेवक प्रविण तिदमे, शहरी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी योगेश म्हस्के आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आले. नामदार दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रविण तिदमे आदी मान्यवरांसह शिवसैनिकांनी संजय बच्छाव यांच्या निवडीचे स्वागत केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…