
no images were found
विद्युत उपसायंत्र परवाने 31 ऑक्टोबरपर्यंत वर्ग व नुतनीकरण करावेत : बांदिवडेकर
कोल्हापूर : पाटबंधारे विभागांतर्गत ज्या बागायतदारांचा, ग्राहकांचा विद्युत उपसायंत्र परवाना 31 डिसेंबर 2019 अखेर कार्यान्वित झालेला नाही असे विद्युत उपसायंत्र परवाने दि. 31 ऑक्टोबरपर्यंत नुतनीकरण करुन घ्यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
31 डिसेंबर 2019 पूर्वी विद्युत उपसायंत्र परवाना मंजुरी घेतलेल्या कागल, करवीर, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील सर्व लाभधारक बागायतदार, सहकारी पाणी पुरवठा संस्था, पाणीवापर संस्था तसेच बिगरसिंचन ग्राहकांनी पाटबंधारे विभागाकडील मयत परवानाधारकांच्या वारसदारांनी परवाने आपल्या नावे वर्ग करुन घ्यावेत अन्यथा परवाने रद्द करण्यात येतील.
ही सेवा विनामूल्य असल्याने या सेवेचा लाभ जास्तीत-जास्त परवानाधारकांनी घ्यावा व आपले परवाने नुतनीकरण / वर्ग करुन घ्यावेत, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.