Home क्राईम कोल्हापूरसह अनेक शहरात एनआयएची छापेमारी

कोल्हापूरसह अनेक शहरात एनआयएची छापेमारी

6 second read
0
0
371

no images were found

कोल्हापूरसह अनेक शहरात एनआयएची छापेमारी

कोल्हापूर : महाराष्ट्रासह अनेक राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारीचे सत्र सुरु केले आहे.  आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रनेणे २० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून कोल्हापूर शहरातील जवाहरनगर आणि  इचलकरंजी येथून  एकाला पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.

कोल्हापूरमधील  जवाहरनगर येथील  साहिल अपार्टमेंटमधील अब्दुल मौला मुल्ला यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. एनआयए ने केलेल्या या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. एनआयए ने टाकलेल्या या छापेमारीमुळे बघ्यांची गर्दी खूप जमल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने राजारामपुरी पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. शिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.

देशातील अनेक शहरात राष्ट्रीय तपास संस्थेची छापेमारी सुरू असून केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयानं केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. त्याचबरोबर पीएफआयच्या पुण्यातील कार्यालयावर एनआयए ने छापे टाकले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली असून पीएफआयच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएनं तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई PFI स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम इथंही झडती घेण्यात आली आहे. NIA आणि ED नं PFI चे अध्यक्ष OMA सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी इथं मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत. एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी 10 राज्यांमध्ये पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची स्थापना झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली होती. तर या संघटनेचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का हे तपासण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून पुण्यातील PFIच्या कार्यालयाजवळ सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…