no images were found
श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या फिडे आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
कर्तव्य श्रीराज,मंदार, आदित्य,प्रज्वल,सोहम,प्रणव प्रदीप,अभिषेक,मधुसूदन आघाडीवर
कोल्हापूर : राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या श्रीपाद कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ महोत्सवातील आज दुसऱ्या खुल्या फिडे आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा व युवा उद्योजिका पल्लवी कोरगावकर व श्रीमती स्नेहा कुलकर्णी यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर उद्योजिका शरयू कुलकर्णी,मुग्धा कुलकर्णी व पद्माराजे हायस्कूलच्या जिमखाना प्रमुख वैजयंती पाटील मॅडम उपस्थित होत्या.आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले हे मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत त्यांना राष्ट्रीय पंच इचलकरंजीचे करण परीट,आरती मोदी,मनीष मारुलकर,उत्कर्ष लोमटे हे सहकार्य करत आहेत. या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात गुरुवार दिनांक 8 डिसेंबर पर्यंत चालणार आहेत.या स्पर्धेसाठी कर्नाटक गोवा गुजरात व महाराष्ट्रातील नामांकित 63 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू सह एकूण 108 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये गुजरातच्या कर्तव्य आन्दकट ला अग्रमानांकन आहे तर कोल्हापूरच्या (रेंदाळ) श्रीराज भोसले ला द्वितीय मानांकन आहे.पारस भोईर (मुंबई), किरण पंडितराव (सेंट्रल एक्साईज) व मंदार लाड (गोवा) यांना अनुक्रमे तिसरी,चौथे व पाचवे मानांकन आहे.आज झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित कर्तव्य आन्दकट (गुजरात) द्वितीय मानांकित श्रीराज भोसले कोल्हापूर, मंदार लाड गोवा, आदित्य सावळकर कोल्हापूर, प्रज्वल आव्हाड अहमदनगर,सोहम खासबारदार कोल्हापूर, प्रणव पाटील कोल्हापूर,प्रदीप आवडे सातारा, पद्मानंद मेनन पुणे व मधुसूदन काबरा बेळगाव हे दहा जण तीन पैकी तीन गुण मिळवून संयुक्तपणे आघाडीवर आहेत.तृतीय मानांकित पारस भोईर (मुंबई) चौथा मानांकित किरण पंडितराव (सेंट्रल एक्साईज), विक्रमादित्य चव्हाण सांगली, अभिषेक गनीगर (बेळगाव) व कुणाल शिंदे(पुणे) हे पाच जण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. श्लोक शिरणार्थी सोलापूर अभिषेक भागरे नाशिक,ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर, आकाश मडीवालर बेळगाव, महिमा शिर्के कोल्हापूर, नंदकुमार सुरू उस्मानाबाद, तृप्ती प्रभू कोल्हापूर, अर्थ कारापूरकर गोवा, मयुरी सावळकर कोल्हापूर, सुरेंद्र सरदार ठाणे,राघव पावडे पुणे,रईस अहमद खान बेळगाव, वरद पाटील कोल्हापूर, विवान सोनी कोल्हापूर, आनंदराव कुलकर्णी कोल्हापूर, रियार्थ पोद्दार इचलकरंजी, अर्णव पाटील कोल्हापूर, राजवीर पाटील गोवा, सिद्धेश किटकारू नागपूर, व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर, स्वरूप जोशी कागल, निलेश चितळकर अहमदनगर दीपंकर कांबळे फलटण, मिहीर श्रीखंडे पुणे व आदित्य कोळी सांगली, हे 31 जण दोन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.