no images were found
बुधवारी महाआवास अभियानातील विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण
पुणे : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासन पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी मध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान राबविण्यात येते. यानिमित्त महाआवास अभियान कालावधीत योजनेमधे उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, पदाधिकारी व अधिकारी यांना ‘महाआवास अभियान ग्रामीण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पुणे विभागातील महाआवास अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणा, तालुका, ग्रामपंचायत, शासकीय जागा उपलब्धतेसाठी कार्य करणाऱ्या आस्थापना, वाळू उपलब्ध करुन देणारे अधिकारी यांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, सदरहू पुरस्कारांचे वितरण, बुधवार, दि. 7 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 11-30 वाजता विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विधान भवन येथील मुख्य सभागृह येथे पार पडला. अभियान विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने पुरस्कारासाठी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून पदाधिकारी, अधिकारी यांची निवड केली होती.