no images were found
कलाकार यंदा पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवत आहेत!
पावसाळा कडक ऊन्हाळ्यापासून आरामदायी दिलासा देतो, पण यासोबत तापमानामधील चढ-उतार, पाण्यामार्फत होणारे आजार आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे अशा समस्यांचा देखील सामना करावा लागतो. व्यस्त शूटिंग वेळापत्रकासह धावपळ कराव्या लागणाऱ्या टेलिव्हिजन कलाकारांना तंदुरूस्त व संसर्ग-मुक्त राहण्याला प्राधान्य द्यावे लागते. हंगामी आरोग्यसंबंधित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ते रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या, गरमागरम व घरी बनवलेल्या आहाराचे सेवन करतात, तसेच हर्बल व पोषण-संपन्न फूड्सचे सेवन करतात. एण्ड टीव्ही कलाकार सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’) पावसाळ्यादरम्यान स्वस्थ व सक्रिय राहण्यासाठी रोगप्रतिकाशक्ती कशाप्रकारे वाढवतात, याबाबत सांगत आहेत. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील सपना सिकरवार ऊर्फ बिमलेश म्हणाल्या, “पावसाळ्यादरम्यान मी सोपे, घरगुती उपाय करत माझी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. मी तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळते, कारण ते या ऋतूसाठी अनुकूल नाहीत. त्याऐवजी मी गरमागरम सूप पिते, वाफवलेल्या भाज्या खाते व हर्बल चहा पिते. मी सकाळी उठल्यानंतर तुळस व आले असलेले कोमट पाणी पिते, ज्यामुळे पचनास मदत होते आणि मला दिवसभर उत्साही वाटते. मी पपई व डाळींब अशी फळे देखील खाते, जी त्वचा व रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम आहेत. हे लहान बदल या ऋतूदरम्यान माझ्यासाठी मोठे बदल घडवून आणतात.”
मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, “पावसाळा आल्हाददायी आहे, पण सोबत आजार होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून मी फूड्सबाबत कोणतीच तडजोड करत नाही, जे माझी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. मी हलक्या प्रमाणात व गरमागरम आहाराचे सेवन करतो, ज्यामध्ये मूग डाळ, भात आणि भाज्या असतात. माझे आवडते इम्यूनिटी बूस्टर म्हणजे दररोज सायंकाळी मी कपभर हर्बल चहाचा आस्वाद घेतो. हा चहा आल्हाददायी व गुणकारी आहे; मी पावसाळ्यादरम्यान रस्त्यावरील खाद्य खात नाही आणि हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर कोमट पाणी पितो. माझ्या निदर्शनास आले आहे की संतुलित, पौष्टिक आहाराच्या सेवनामुळे दीर्घकाळपर्यंत शूटिंगदरम्यान माझे अवधान केंद्रित राहते आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहतो. मी पावसाळ्याचा आनंद घेण्यासोबत पौष्टिक व संतुलित आहार सेवन करण्याची खात्री घेतो, कारण माझा विश्वास आहे की उत्तम आरोग्याची सुरूवात पौष्टिक आहारासोबत होते.”