no images were found
इंधन करावरील नवीन दराचा आढावा दर १५ दिवसांनी घेणार : अर्थमंत्री
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही गेल्या सहा महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही. या काळात सरकार आता दर १५ दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि एव्हिएशन फ्युएल (एटीएफ) वर लावण्यात आलेल्या नवीन कराचा आढावा घेणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. म्हणजेच सरकारकडून आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन इंधन करावरील दराचा १५ दिवसांनी आढावा घेतला जाईल. अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, “जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या असून, इंधनाच्या किमतींबाबत यावेळी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उताराचे वातावरण आहे. परंतु सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, “आम्ही निर्यातीला परावृत्त करू इच्छित नाही तर देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध नसेल आणि निर्यात होत राहिली, तर त्याचा काही भाग आपल्या नागरिकांसाठी ठेवण्याची गरज आहे.” मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि या वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचली. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर मार्चमध्ये तेलाच्या किमती १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या, जो २००८ नंतरचा त्यांचा सर्वोच्च स्तर आहे. मात्र, अलीकडे त्याच्या किंमतींत घट नोंदवण्यात आली आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यापासून काही राज्यांनी इंधनावरील व्हॅटचे दरही कमी करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपयांनी कपात केली. सरकारी तेल कंपन्यांनी एटीएफच्या किमतीत २.३ टक्क्यांनी कपात केली आहे. तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्याही कोणताही बदल झालेला नाही.