
no images were found
‘वेड’ चित्रपटातील दुसरे गीत ‘बेसुरी‘ सर्वत्र प्रदर्शित…
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे. IMDB या साईटवर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे.
नुकतेच त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘ वेड तुझा’ प्रदर्शित झाले होते. त्या गीताला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता ‘वेड’ च्या निर्मात्यांनी ‘बेसुरी’ हे गीत आज प्रदर्शित केले. हे गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने ‘देश म्यूजिक’ लेबलद्वारे हे गीत प्रकाशित केले आहे.