Home राजकीय कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राडा

कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राडा

0 second read
0
0
35

no images were found

कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राडा
मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फोन करून यां घटनेचा निषेध केला. हे होत असताना आता पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील स्वरगेट बस स्ठानकावर जावून कर्नाटक परिवहन मंडलच्या गाड्यांना काळे फासले पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल जात आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचल करंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आंदोलन केलं.
सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी बस स्थानकात मनसेनं आंदोलन केलं. कर्नाटक गाडीच्या समोर केली निदर्शने महाराष्ट्रात कर्नाटकची एकही गाडी फिरू देणार नाही असा घेतला पवित्रा मनसेने घेतला आहे. कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात केलेल्या राड्याचा मनसेनं तीव्र निषेध केलाय. महाराष्ट्रातील मनसे आता जशास तसे उत्तर देणार, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मांडली. बेळगाव मध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र एसटी प्रशासन सतर्क झाले आहे. जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्यांची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बस थांबवल्या जातील. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीसही सीमेवर तैनात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…