no images were found
ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई; महिलेसह दोन एजंट ताब्यात
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत एका रो बंगल्यात छापा मारून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आलीय, तर दोन एजंटाना अटक केली आहे .
याबाबतची माहिती अशी कि, शाहुपुरी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये ताराबाई पार्क येथील रो बंगला (नं. 08, ए 36, ए/31, फाळके कपौउंड, मनिश पार्क, कोल्हापूर) हा गहानवट घेवून या बंगल्यात गरीब व असहाय महिलांचा गैरफायदा घेवून, त्यांना प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रध्दा आंबले यांच्या मार्गदर्शनखाली याठिकाणी छापा टाकण्यात आला.
यावेळी एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. तसेच एजंट गौतम संजय धामेजा (वव. 21, रा. राधा स्वामी बस स्टॉप जवळ, इंदीरा नगर झोपडपट्टी, गांधीनगर) व खुशबु सादीक खाटीक (वव. 36, रा. माळ गल्ली, कदमवाडी) या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा.फौजदार रविंद्र गायकवाड, राजेंद्र घारगे, पो.हे.कॉ आनंदराव पाटील, किशोर सूर्यवंशी, सायली कुलकर्णी, मिनाक्षी पाटील, अभिजीत घाटगे, शुभांगी कांबळे यांनी सहभाग घेतला