Home सामाजिक धारावी पुनर्वसन घरांसाठी भूमिपूजन संपन्न

धारावी पुनर्वसन घरांसाठी भूमिपूजन संपन्न

10 second read
0
0
15

no images were found

धारावी पुनर्वसन घरांसाठी भूमिपूजन संपन्न

 सारांश:

  • अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (एईएल) संचालक श्री. प्रणव अदाणी यांच्या हस्ते माटुंगा येथे भूमिपूजन पार पडले. या निमित्ताने पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली.
  • प्रकल्पात १० इमारती असून त्यात १०,४३२ पुनर्वसन सदनिका आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळे आहेत.
  • महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. असीम कुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे होते. धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (डीआरपी/एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हेदेखील समारंभाला उपस्थित होते.
  • सेक्टर ६ आणि १ मधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळतील. त्यानंतर सुमारे ४,५०० सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जातील. 

मुंबई: अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (एईएल) संचालक श्री. प्रणव अदाणी यांच्या हस्ते सोमवारी माटुंगा येथील रेल्वेच्या २२ एकर जागेवर भूमिपूजन पार पडले. या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या आणि १० लाखांहून अधिक रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या धारावीतील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली.धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही) असलेली अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) मूळ जागी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देईल.

 ‘‘प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित वाटेल आणि भविष्याचे नियोजन करता येईल, असे घर मिळायला हवे. धारावीतील कुटुंबांसाठी याचा काय अर्थ आहे, हे आम्ही जाणतो. माटुंगा येथे आम्ही १० इमारतींमध्ये १०,४३२ घरे आणि १,३७९ व्यावसायिक व औद्योगिक गाळे उभारत आहोत. कुटुंबांना अधिक चांगले जीवन व्यतीत करता येईल आणि आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्य घडवता येईल, अशा वसाहती आम्ही निर्माण करत आहोत,’’ असे श्री. प्रणव अदाणी म्हणाले.

    या प्रकल्पासाठी अमेरिकास्थित डिझाइन कंपनी सासाकी, यूकेस्थित अभियांत्रिकी सल्लागार संस्था ब्युरो हॅपोल्ड, मुंबईस्थित स्टुडिओ पॉड, सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री. हफीझ कॉन्ट्रॅक्टर, पी अँड टी आणि आर्क स्टुडिओ यांच्यासह सिंगापूरमधील नगररचना तज्ज्ञांचे डिझाइन, अभियांत्रिकी आणि शहरी नियोजनातील कौशल्य वापरण्यात आले आहे.या १० इमारती तीन टप्प्यांत महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (डीआरपी/एसआरए) हस्तांतरित केल्या जातील. पहिल्या पाच इमारती मार्च २०२९ पर्यंत, त्यानंतरच्या दोन इमारती ऑगस्ट २०२९ पर्यंत, तर उर्वरित तीन इमारती ऑगस्ट २०३० पर्यंत हस्तांतरित होतील.

     महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. असीम कुमार गुप्ता हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. डीआरपी/एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. महेंद्र कल्याणकर हेदेखील समारंभाला उपस्थित होते.

     डॉ. कल्याणकर म्हणाले, ‘‘धारावीतील कुटुंबांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयीसुविधांसह सुरक्षित, आधुनिक घरे देण्यावर आमचा भर आहे.’’प्रत्येक इमारत ३७ ते ३९ मजल्यांची असेल. प्रत्येक इमारतीत १० ते १२ प्रवासी लिफ्ट्स आणि दोन स्वतंत्र फायर लिफ्ट्स असतील. व्यावसायिक व औद्योगिक गाळ्यांसाठी आणखी दोन लिफ्ट्स असतील. किंडरगार्टन, कम्युनिटी हॉल, पोडियम उद्याने, आसनव्यवस्था, सोसायटी ऑफिसेस आणि प्रार्थनास्थळे या सुविधांचा त्यात समावेश असेल.प्रत्येक पुनर्वसन इमारतीतील १० टक्के व्यावसायिक जागा सामायिक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळवण्याकरिता राखीव ठेवली जाईल. इमारती हस्तांतरित झाल्यानंतर पहिली १० वर्षे इमारती आणि सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल एएनडीपीएल करेल.

    या भूमिपूजनाच्या काही दिवस आधी, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन झाले. महात्मा गांधींच्या १५७व्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. फडणवीस यांनी धारावीला समर्पित गीताचे अनावरण केले, तसेच धारावीतील रहिवासी, संस्कृती आणि इतिहास यांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.२२,५०० चौरस फुटांवर उभारलेल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष आकाराचे सॅम्पल फ्लॅट्स, थ्री डी वॉक थ्रू आणि संवादी प्रदर्शने आहेत. त्यांतून निवास, कामाच्या जागा, सोयीसुविधा, वाहतूक आणि मोकळ्या जागा यांची माहिती देऊन रहिवाशांना प्रस्तावित पुनर्विकासाची झलक मिळते.

‘‘धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे रहिवाशांना नियोजित घरे आणि परिसराची पहिली झलक पाहता आली. आता बांधकामाला सुरुवात होत असताना आमचा भर प्रत्यक्ष हस्तांतरण आणि दीर्घकालीन देखभाल यावर आहे. हस्तांतरणानंतर १० वर्षे प्रत्येक इमारतीची आणि तिच्या सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल आम्ही करू,’’ असे एएनडीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल सरदाना म्हणाले.सर्वंकष अशा या पुनर्विकासात दुकाने, शाळा, आरोग्य सुविधा, प्रार्थनास्थळे, उद्याने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधा असलेली संमिश्र वापराची (मिक्स्ड-यूज) टाउनशिप प्रस्तावित आहे. अत्यावश्यक सेवा १५ मिनिटांच्या पायी अंतरात उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…