Home सामाजिक कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव

3 second read
0
0
18

no images were found

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव: १३ ऑक्टोबर रोजी पर्यटक व नागरिकांना ‘कोल्हापूर चित्रनगरीची विनामूल्य सफर’

कोल्हापूर,: कोल्हापूरच्या दसरा महोत्सवा अंतर्गत मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 9 ते 6 या वेळेत “कोल्हापूर चित्रनगरीची नागरिकांना सफर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक आणि पर्यटकांसाठी चित्रनगरी परिसर विनामूल्य पाहता येणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या महोत्सवा अंतर्गत कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना चित्रपटसृष्टीतील कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि मोलाच्या योगदानाची माहिती व्हावी, यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्र उत्सव आणि दसरा महोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या कला आणि चित्रपट परंपरेचा अनुभव घेण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा करमणूक कर विभाग व व्यवस्थापक, कोल्हापूर चित्रनगरी, मोरेवाडी, ता. करवीर यांच्या समन्वयाने आयोजित या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी कार्यासन ७ अ, करमणूक कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, दूरध्वनी क्र.: ०२३१-२६८०७९१, ई-मेल: entkolhapur@gmail.com येथे संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…