no images were found
सामुहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी प्लॅस्टिक फिल्म पुरवठा उत्पादकांनी 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत रिइनफोर्डस एचडीपीई जाओमेंम्बरेन आयएसआय (आयएस : 15351:2015) 500 मायक्रॉन जाडीच्या फिल्म पुरवणा-या उत्पादक कंपन्यांच्या विक्रेता, वितरकांनी जिल्हास्तरावर दि. 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी उपसंचालक रविंद्र पाठक यांनी केले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत सामुहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत अस्तरीकरणाच्या वापरावयाच्या रिइनफोर्डस एचडीपीई जाओमॅम्बरेन आयएसआय (आयएस : 15351:2015) 500 मायक्रॉन जाडीच्या फिल्मबाबत उत्पादक कंपन्यांची राज्यस्तरावर नोंदणी प्रक्रिया (Empanelment) जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे.
नोंदणीसाठी अटी व शर्तीसाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर कार्यालय, चाळीस ठाणा, भगवा चौक, कसबा बावडा, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाठक यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.