Home Uncategorized गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या घालून हत्या!

गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या घालून हत्या!

3 second read
0
0
95

no images were found

गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या घालून हत्या!

राजस्थान :  सीकर येथे गँगस्टर राजू ठेहट (सीकर) याची त्याच्या घराबाहेरच भरदिवसा त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की, सीकर मधील कुख्यात गँगस्टर राजू ठेहट याची घराबाहेरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  भरदिवसा त्याच्यावर गोळ्या झाडल्याने त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. राजू ठेहटच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगमधील लोक असल्याची चर्चा होतेय. या हत्येप्रकरणी एका गँगने जबाबदारी स्वीकारली असून राजूची हत्या आपण बदला घेण्यासाठी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजू ठेहट याच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या गँगचं नाव आनंदपाल असून आनंदपाल गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँग एकत्रत काम करत होती. दरम्यान आनंदपाल गँगने राजूच्या हत्येचा कट आखल्याची कबूली दिली आहे. राजू ठेहटची हत्या करुन पळून जात असणारे मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये एक गोळी रस्त्यावरील व्यक्तीला लागुन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

यावेळी जवळपास ५० ते ६०  राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. राजू ठेहट हा सकाळी घराबाहेर पडला होता. दरम्यान त्याच्या हत्येच्या कटातील लोक त्याला मारण्यासाठी जवळपास दबा धरुन बसले होते. राजूला पाहताच त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्याच्या आवाजाने जवळपासचे लोक राजूच्या दिशेने धावले. जखमी राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  परंतु तेथे त्याला डॉक्टरांनी उपचाराआधीच मृत घोषित केले. सदर घटनेनंतर पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेऊन जागोजागी नाकाबंदी केली आहे. या हत्याप्रकरणीचे  सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. काही पोलीस पथके या घटनेतील आरोपींच्या मागावर तैनात करण्यात आली असून लवकरात लवकर मारेकऱ्यांचा शोध लावून त्यांना अटक होईल, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…