Home शासकीय ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप; 39 जणांना नोटीस

ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप; 39 जणांना नोटीस

2 second read
0
0
317

no images were found

ठेकेदारांच्या मनमानीला कोल्हापूर मनपा आयुक्तांकडून चाप; 39 जणांना नोटीस

कोल्हापूर : शहरातील सुरु असलेल्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठेकेदारांवर मनपा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंडाची कारवाई करत दणका दिला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला २४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील ११९ कामासाठी ३९ ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दोन आरोग्य निरीक्षकांवरही दैनंदिन काम जबाबदारीने न केल्याने दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
ठेकेदार शैलेश भोसलेच्या कामातील दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून २४ हजार दंडाची शिक्षा करण्यात आली. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रंमांक२ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश भोसलेला देण्यात आले होते. या कामाचा कार्यादेश १५ फेब्रुवारी २०२२ रोजी ठेकेंदार यांना देण्यात येऊन या कामास १८० दिवस मुदत दिलेली आहे. संबंधीत ठेकेदार भोसलेला विहित मुदतीत काम चालू केले नसलेने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दंड ठोठावण्याची सूचना उप-शहर अभियंतांना दिली. त्याप्रमाणे विभागीय कार्यालय क्र.२ ने ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांना त्यांच्या अदा करावयाच्या बिलातून विलंब आकार २४ हजार कपात केला.
तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक निरिक्षक राजेंद्र पाटील यांना २ हजार रुपयांचा दंड तर आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांना १ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सदरचा दंड त्यांच्या पगारातून वसूल केला जाईल. शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव, डर्टी स्पॉटचे सौंदर्यीकरण, नाला/चॅनेल सफाई करणेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना फिरतीवेळी ए-३ चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व ई-३ चे आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांच्या भागामध्ये दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्याचे निदर्शनास आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…