Home उद्योग अदाणी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर भूतानमध्ये 770 मेगावॅट क्षमतेचा चमखरछू-I जलविद्युत प्रकल्प उभारणार

अदाणी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर भूतानमध्ये 770 मेगावॅट क्षमतेचा चमखरछू-I जलविद्युत प्रकल्प उभारणार

6 second read
0
0
6

no images were found

अदाणी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर भूतानमध्ये 770 मेगावॅट क्षमतेचा चमखरछू-I जलविद्युत प्रकल्प उभारणार

  • अदाणी पॉवर आणि ड्रुक ग्रीन पॉवर यांची 49:51 टक्के भागीदारी असेल.
  • प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण केला जाणार.
  • हा प्रकल्प अदाणी समूह आणि भूतान सरकारमधील 5,000 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या मोठ्या धोरणात्मक भागीदारीचा एक भाग आहे.

थिम्पू/अहमदाबाद, : भारतातील प्रमुख खासगी वीज निर्मिती कंपनी अदाणी पॉवर आणि भूतान सरकारच्या मालकीची वीज निर्मिती कंपनी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (डीजीपीसी) यांनी भूतानमध्ये 770 मेगावॅट क्षमतेचा चमखरछू-I जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी आज भागधारक करारावर (शेअरहोल्डर्स अॅग्रीमेंट) स्वाक्षरी केली. या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमाला भूतानचे माननीय पंतप्रधान ल्योंचेन दशो शेरिंग टोबगे उपस्थित होते. यावेळी अर्थमंत्री, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री तसेच ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (डीएचआय), भूतान पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसी), डीजीपीसी बोर्ड, डीजीपीसी व्यवस्थापन आणि अदाणी पॉवरचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

हा प्रकल्प दोन्ही कंपन्यांमधील दुसरा मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये 570 मेगावॅटच्या वांगछू जलविद्युत प्रकल्पासाठी करार करण्यात आला होता. हा प्रकल्प मे 2025 मध्ये अदाणी समूह आणि डीजीपीसी यांच्यात झालेल्या 5,000 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याच्या सामंजस्य कराराचा (MoU) देखील एक भाग आहे.

हा प्रकल्प भूतानच्या मध्य भागातील झेमगांग जिल्ह्यात चमखरछू नदीवर उभारला जाणार आहे. हा पीकिंग रन-ऑफ-द-रिव्हर प्रकल्प बांधा, मालकी घ्या, चालवा आणि हस्तांतरित करा (BOOT) या पद्धतीने विकसित केला जाईल. यामध्ये अदाणी पॉवरची 49 टक्के आणि डीजीपीसीची 51 टक्के भागीदारी असेल. प्रकल्पाची सवलत कालावधी व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यापासून 30 वर्षांची असेल. या प्रकल्पामुळे भूतानची स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता वाढण्यास तसेच भारत-भूतानसह प्रादेशिक ऊर्जा सहकार्याला चालना मिळण्यास मदत होईल. प्रकल्पाचे बांधकाम 2027 च्या पहिल्या सहामाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर सहा वर्षांच्या आत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे.

अदाणी पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना म्हणाले, “चमखरछू जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूतान आणि डीजीपीसी सोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. दक्षिण आशियातील ऊर्जा संक्रमणाला वेग देण्यासाठी जलविद्युत प्रकल्पांची महत्त्वाची भूमिका असेल. हा प्रकल्प ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास, कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यास आणि शाश्वत विकासाची सामायिक उद्दिष्टे पुढे नेण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल. या प्रकल्पामुळे भूतानमध्ये हिवाळ्यातील विजेची जास्त मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच, उन्हाळ्यात अतिरिक्त हरित वीज भारताला निर्यात करण्यासही मदत होईल. यामुळे दोन्ही देशांना दीर्घकाळ फायदा होईल.”

डीजीपीसी चे व्यवस्थापकीय संचालक दशो छेवांग रिनजिन म्हणाले, “ही भागीदारी भूतानच्या जलविद्युत विकासाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, भूतान आणि भारतामधील दीर्घकाळापासून असलेले ऊर्जा सहकार्य आणखी मजबूत करण्यास यामुळे मदत होईल. 770 मेगावॅटचा चमखरछू-I जलविद्युत प्रकल्प विशेषतः हिवाळ्यात भूतानची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास मदत करेल. यासोबतच अतिरिक्त स्वच्छ ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून ती भारताला निर्यात करण्याच्या संधीही उपलब्ध होतील. हा प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीपुरता मर्यादित नसून, मजबूत भागीदारी आणि जबाबदारीने प्रकल्प पूर्ण करण्याच्या माध्यमातून भूतानच्या अक्षय ऊर्जा संसाधनांचा विकास करण्याची आमची सामायिक बांधिलकी दर्शवतो. हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यासोबतच जलविद्युत विकास भागीदारीअंतर्गत भविष्यातील संधींसाठीही अदाणी पॉवरसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

दोन्ही संस्था 5,000 मेगावॅटच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत जलविद्युत क्षेत्रातील अतिरिक्त संधींचा सातत्याने सक्रियपणे आढावा घेत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

अधिकृत फेरीवाल्यांसाठी आयोजीत विशेष कॅम्पला उत्सफुर्त प्रतिसाद

अधिकृत फेरीवाल्यांसाठी आयोजीत विशेष कॅम्पला उत्सफुर्त प्रतिसाद कोल्हापूर, : कोल्हापूर महान…