Home सामाजिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त “जलद चालण्याची स्पर्धा” उत्साहात

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त “जलद चालण्याची स्पर्धा” उत्साहात

26 second read
0
0
5

no images were found

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त “जलद चालण्याची स्पर्धा” उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी ): एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघ तसेच पूनम तोडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जलद चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा “नवीन वाशी नाका चौक ते कणेरकर नगर रिंग रोड” या ८०० मीटर मार्गावर घेण्यात आली. या स्पर्धेला साने गुरुजी वसाहत व आपटे नगर परिसरातील १०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संघाचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. सकाळी  ७.३० वाजता नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा  पूनमताई तोडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.  तोडकर यांनी या स्पर्धेसाठी बक्षिसे जाहीर केली होती.

▪️स्पर्धेचे स्वरूप:
स्पर्धा दोन गटात घेण्यात आली – ६५ वर्षाखालील गट आणि ६५ वर्षावरील गट. प्रत्येक गटात महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ३ बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम क्रमांक – ५०० रु, द्वितीय – ३०० रु, तृतीय – २०० रु.

स्पर्धकांनी ८०० मीटर अंतर जलद चालत पूर्ण करून तेथे प्रतिनिधी अशोक चौगुले व विश्वास शिरोळे यांच्याकडून टोकन घेऊन पुन्हा मूळ ठिकाणी यायचे होते. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोन प्रतिनिधी स्कूटरवरून लक्ष ठेवत होते. स्पर्धेच्या सुरुवातीला अशोक पोतनीस यांनी सर्वांसाठी हास्ययोगाचे प्रकार घेतले.

◼️विजेते स्पर्धक:
▪️६५ वर्षावरील पुरुष गट:

१. प्रथम –  परशुराम नांदवडेकर

२. द्वितीय – ८० वर्षीय  बाळासाहेब भोगम

३. तृतीय – विभागून – अशोक पाटील व  श्रीकांत नलावडे

 

◼️६५ वर्षांवरील महिला गट:-

१. प्रथम.  राजश्री नांदवडेकर

२. द्वितीय. श्रीमती समिता सुर्वे

३. तृतीय. श्रीमती मालती जोशी

 

▪️६५ वर्षाखालील पुरुष गट:

१. प्रथम –  अशोक शांताराम पोतनीस

२. द्वितीय –  संग्राम मोहन वेल्हाळ

३. तृतीय –  रंगराव दत्तू पाटील

▪️६५ वर्षाखालील महिला गट:

१. प्रथम –  जयश्री मिलिंद पाठक

२. द्वितीय – सुरेखा मोहिते

३. तृतीय – श्रीमती नीता हातकर

स्पर्धेनंतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र, विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र, आणि सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी पूनमताई तोडकर यांनी ज्येष्ठांनी आरोग्यासाठी अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. तर अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी संघातर्फे पर्यटन, कराओके, एकांकिका अशा विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची माहिती दिली व जास्तीत जास्त नागरिकांनी सभासद व्हावे असे आवाहन केले.

या स्पर्धेसाठी उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, सचिव शरद दिवाण, दीपक पंडित, दिलीप सासने, महादेव कुंभार, डॉ. सुरेखा पाटील, सिंधुताई शिरोळे, राजश्री सूर्यवंशी, अशोक चौगुले, विश्वास शिरोळे, संजय वाघापूरकर, अरुण कुलकर्णी, सुहास शेलार आदींनी सहकार्य केले.  प्रमोद व्हनगुत्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई कोल्हापूर, : कोल्हापू…